परभणी : बोरगव्हाण येथील रेशीम शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:54 AM2019-06-22T00:54:39+5:302019-06-22T00:55:10+5:30

मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी राज्य शासनाने अनुदान योजना सुरू केली असली तरी योजनेची कामे करूनही उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोरगव्हाण येथील ९ शेतकऱ्यांची शेड बांधकामाची ४ लाख रुपयांची कुशल देयके वर्षभरापासून रखडली असल्याने लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत.

Parbhani: The problem of silk farmers in Borgahan | परभणी : बोरगव्हाण येथील रेशीम शेतकरी अडचणीत

परभणी : बोरगव्हाण येथील रेशीम शेतकरी अडचणीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी राज्य शासनाने अनुदान योजना सुरू केली असली तरी योजनेची कामे करूनही उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोरगव्हाण येथील ९ शेतकऱ्यांची शेड बांधकामाची ४ लाख रुपयांची कुशल देयके वर्षभरापासून रखडली असल्याने लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत.
रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६-१७ वर्षापासून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तुती लागवड आणि शेड बांधकाम करण्यासाठी अनुदान योजना सुरू केली. ९० हजार रुपये शेड बांधकाम आणि २ लाख रुपये शेतात तुती लागवड आणि व्यवस्थापन असे २ लाख ९५ हजार रुपये अनुदान दिल्या जाते. तुती लागवडीचा कार्यक्रम ३ वर्षे असून ३ वर्षात अनुदान वितरित केले जाते. मात्र पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील लाभार्थी शेतकºयांना शेड बांधकामाचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. या योजनेसाठी जिल्हा रेशीम कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असून तालुक्यातील बोरगव्हाण येथे २०१६-१७ या वर्षात २२ शेतकºयांना रेशीम विभागाने तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी मान्यता दिली होती. मात्र शेतकºयांचा ३ वर्षाचा अनुदान कालावधी गत वर्षी संपला आहे. येथील ९ शेतकºयांनी २ वर्षापूर्वी तुती सोबत शेतात रेशीम शेड उभारणी केली आहे. बांधकाम झाल्यानंतर बिल सादर करण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये बांधकामाचे ९ लाभार्थी शेतकºयांचे प्रत्येकी ४५ हजार प्रमाणे ४ लाख ५ हजार रुपयांची देयके तहसील कार्यालयामध्ये आॅनलाईन दाखल झाली आहेत. मात्र ती शेतकºयांना कुशल देयके प्राप्त झाली नाहीत.
शेतकºयांची जिल्हाधिकाºयांकडे धाव
४पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील शेतकºयांना तीन वर्षापूर्वी शेड बांधकाम केल्याचे अनुदान मिळाले नाही. विशेष म्हणजे यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शेतकºयांना आधार देण्यासाठी केंद्रशासनासह राज्यशासन व शासकीय यंत्रणा सरसावल्या असताना दुसरीकडे मात्र स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून केलेल्या बांधकामाचेही पैसे अद्यापपर्यंत मिळाले नाही.
४त्यामुळे याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शेतकºयांनी केली आहे. निवेदनावर नितीन इंगळे, भागवत इंगळे, केशवराव इंगळे, दत्तराव खुडे, सुखदेव शिंदे, राधेश्याम खुडे, संतोष अवताडे, परमेश्वर इंगळे, नारायण शिंदे ,वैभव खुडे यांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Parbhani: The problem of silk farmers in Borgahan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.