परभणी:श्रीरामांच्या जयघोषात मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:21 PM2019-04-13T23:21:37+5:302019-04-13T23:21:49+5:30

राम जन्मोत्सव समितीच्या वतीने शनिवारी परभणी शहरातून श्रीरामांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील सजीव देखावे, ढोल पथक, लेझीम पथक, बॅन्ड पथकासह ५० फुटाच्या तिरंगा ध्वजाने नागरिकांचे लक्ष वेधले.

Parbhani: The procession in the auspices of Shriram | परभणी:श्रीरामांच्या जयघोषात मिरवणूक

परभणी:श्रीरामांच्या जयघोषात मिरवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राम जन्मोत्सव समितीच्या वतीने शनिवारी परभणी शहरातून श्रीरामांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील सजीव देखावे, ढोल पथक, लेझीम पथक, बॅन्ड पथकासह ५० फुटाच्या तिरंगा ध्वजाने नागरिकांचे लक्ष वेधले.
शनिवारी जिल्हाभरात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच रामनवमीची ठिकठिकाणी तयारी करण्यात आली होती. परभणी शहरातील जागृती नगर भागातील राम मंदिर, प्रल्हाद राम मंदिर, गांधी पार्कातील राजाराम सभागृह यासह इतर मंदिरांमध्येही दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आरती, गुलालांची उधळण करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास शहरातील प्रमुख मार्गावरुन श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अश्व, फेटाधारी महिला, बुलेटस्वार महिला, वासुदेव, गोंधळी, मुलींचे लेझीम पथक, सोलापूर येथील हालगी पथक, नाशिक येथील स्वरसंगम बॅन्ड, पुणे येथील ढोल पथक, तांडव ग्रुपचा सजीव देखावा यासह ५० फुटांचा तिरंगी ध्वज हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेली ही मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, स्टेशनरोड, विसावा कॉर्नर, नारायण चाळ, गांधी पार्क, शिवाजी चौक, नानलपेठमार्गे शनिवार बाजारपर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी महाआरतीने मिरवणुकीची सांगता झाली.
परभणीत शहरात ठिकठिकाणी स्वागत
४मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. ढोल-ताशांचा गजर आणि जय श्रीरामचा जयघोष करीत ही मिरवणूक मुख्य मार्गाने जात होती. या मार्गाच्या दोन्ही बाजुला मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ठिक ठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
पूर्णेत श्रीराम जन्मोत्सव
४पूर्णा- शहर व परिसरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने जागृत हनुमान मंदिर आनंदनगर येथून सकाळी शोभायात्रेला प्रारंभ झाला. आयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेला देखवा मिरवणुकीचे आकर्षण ठरले. जय श्रीरामच्या जयघोषणाने शहर दुमदुमून गेले. आनंदनगर, महावीरनगर, संत नरहरी महाराज चौक येथे थंडपेय वाटप करण्यात आले. प्रमुख मार्गावर रांगोळी काढली होती. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. बसवेश्वर चौक, शिवाजी चौक, सराफा बाजार, महादेव मंदिर, गुरुबुद्धी स्वामी मठमार्गे निघालेल्या या शोभायात्रेची श्रीराम मंदिर भागात सांगता झाली. दुपारी राम मंदिर येथे जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. मयूर दायमा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मारवाडी समाजबांधव व मंदिर संयोजन समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मानवतमध्ये शोभायात्रा
४मानवत- रामनवमीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने श्रीराम यांच्या पूर्णाकृती प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राम, सीता, हनुमानाचे सजीव देखावे सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेपासून सायंकाळी ६ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. पाथरीनाका, पोलीस ठाणे, कापड मार्केट, भाजी मंडई, कडतन गल्ली, कुºहाडे गल्ली, मंत्री गल्लीमार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर मोठा मारोती मंदिर येथे महाआरती करण्यात आली. या मिरवणुकीत बालक, युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेपासून लाड गल्लीतील राममंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

Web Title: Parbhani: The procession in the auspices of Shriram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.