परभणी : ६५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 11:18 PM2020-03-05T23:18:20+5:302020-03-05T23:18:49+5:30

शहराच्या विकासाचा डोलारा ज्या कराच्या वसुलीवर अवलंबून आहे, त्या मालमत्ता कराची ६५ कोटी रुपयांची थकबाकी शहरवासियांकडे असून ही थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महानरगपालिका प्रशासनासमोर आहे. यासाठी मनपाने वसुली पथकांची स्थापना केली असून, कार्यालयीन वेळेतही बदल करीत रात्री उशिरापर्यंत थकबाकी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़

Parbhani: Property tax of Rs 2 crores exhausted | परभणी : ६५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला

परभणी : ६५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराच्या विकासाचा डोलारा ज्या कराच्या वसुलीवर अवलंबून आहे, त्या मालमत्ता कराची ६५ कोटी रुपयांची थकबाकी शहरवासियांकडे असून ही थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महानरगपालिका प्रशासनासमोर आहे. यासाठी मनपाने वसुली पथकांची स्थापना केली असून, कार्यालयीन वेळेतही बदल करीत रात्री उशिरापर्यंत थकबाकी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़
शहरात मालमत्ता कर आणि नळपट्टी वसुलीवरच महानगरपालिकेचे उत्पन्न अवलंबून आहे़ याशिवाय वृक्ष, शिक्षण, स्वच्छता हे करही मनपा वसूल करते; परंतु, त्याचा अंतर्भाव मालमत्ता करामध्ये असल्याने मालमत्ता कराच्या वसुलीला महत्त्व आले आहे़ परभणी शहरात सुमारे ८५ हजार मालमत्ता असून, या मालमत्ता धारकांकडून आतापर्यंत नियमित कर वसुली होत नव्हती़ परिणामी थकबाकीचा आकडाही मोठ्या प्रमाणात आहे़ दोन वर्षापूर्वी मनपाने मालमत्तांचे सर्वेक्षण केल्यानंतर यात सुसूत्रता आली आहे़ सद्यस्थितीला शहरवासियांकडे सुमारे ६५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला असून यातील चालू थकबाकीचे २३ कोटी रुपये वसूल मनपाला अपेक्षित आहे़ ही रक्कम वसूल करण्यासाठी १ मार्चपासूनच प्रशासनाने नियोजन केले आहे़ त्यासाठी ३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रभाग समितीनिहाय सर्व नागरिकांपर्यंत कराची बिले पोहचती झाली आहेत़ त्यामुळे हा कर वसुलीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे़ घरोघरी जाऊन वसुली केली जात असून, तीनही प्रभाग समिती कार्यालयात रात्री ८ वाजेपर्यंत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ त्यामुळे यावर्षी मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली़
ंसव्वातीन कोटींची वसुली
४मनपा प्रशासनाने शहरात वसुली मोहिमेला गती दिली असून, २९ फेब्रुवारीपर्यंत ३ कोटी ३६ लाख रुपयांची वसुली झाली आहे़
४१ मार्चपासून रात्री उशिरा, त्याच प्रमाणे सुटीच्या दिवशीही वसुली करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यामुळे ३१ मार्च अखेरपर्यंत संपूर्ण वसुली केली जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला़
नळ जोडणीचा होणार परिणाम
४यावर्षी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून, योजनेवर नागरिकांना नळ जोडणी दिली जात आहे़ ही जोडणी घेताना प्रत्येक नागरिकाला त्याची थकबाकी अदा करणे बंधनकारक आहे़ त्याच प्रमाणे मुदतीत कर भरणा करणाºया नागरिकांना मालमत्ता कराच्या शास्तीवर ५० टक्के आणि पाणी कराच्या शास्तीवर १०० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे यावर्षी निश्चितच मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात होईल, अशी आशा आयुक्त रमेश पवार यांनी व्यक्त केली़
आॅनलाईन सॉफ्टवेअरचीही मदत
४शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण दोन वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. त्याचबरोबर यावर्षी सर्व मालमत्ताधारकांच्या नोंदी आॅनलाईन सॉफ्टवेअरला करण्यात आल्या आहेत.
४यावर्षी प्रथमच महानगरपालिकेने आॅनलाईन सॉफ्टवेअरमध्ये प्रिंट झालेली मालमत्ता बिले शहरवासियांना वितरित केली आहेत. वसुली झाल्यानंतर या बिलांची नोंद सॉफ्टवेअरलाच होणार असल्याने थकबाकी आणि वसुलीची माहितीही एका क्लिकवर मिळणार असल्याने या सॉफ्टवेअरची वसुलीसाठी एक प्रकारे मदतच होणार आहे.

Web Title: Parbhani: Property tax of Rs 2 crores exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.