परभणी : सिंचन विहिरींचे प्रस्ताव धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:00 AM2018-12-03T01:00:09+5:302018-12-03T01:00:30+5:30
तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव किरकोळ कारणामुळे धूळ खात पडून आहेत़ कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक त्रुटीची पूर्तता करीत नसल्याने नव्याने एकही काम सुरू झाले नाही़
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव किरकोळ कारणामुळे धूळ खात पडून आहेत़ कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक त्रुटीची पूर्तता करीत नसल्याने नव्याने एकही काम सुरू झाले नाही़
पालम तालुक्यात यावर्षी दुष्काळी स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे़ शेतीत कामधंदा नसल्याने मजूर वर्ग स्थलांतर करीत आहे़ गावात हाताला काम व कामाप्रमाणे दाम देण्यासाठी शासन रोजगार हमी योजना राबवित आहे़ मागील वर्षी पंचायत समितीकडे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर नवीन सिंचन विहिरींसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत़ उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छाननी समितीने ३८० कामांना बैठकीत मंजुरी दिली होती़ यानंतर प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेशासाठी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी यांच्याकडे पाठविण्यात आला होता़
संचिकांच्या प्रवासात पावसाळा सुरू झाल्याने एकाही कामाला मंजुरी देण्यात आली नाही़ मात्र आता जिल्हा परिषद स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत़
प्रस्तावासोबत जिओ टॅगींग करून जागेचा फोटो व पंचनामा पाठविण्याचे आदेश आहेत़ मात्र याकडे ग्रामरोजगार सेवक, कंत्राटी कर्मचाºयांनी पाठ फिरविली आहे़ त्यामुळे महिनाभरापासून प्रस्ताव धूळ खात पडले असून, याचा शेतकºयांना फटका बसत आहे़
शेतकºयांचे कार्यालयात हेलपाटे
४रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचे काम करण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत़ ग्रामपंचायतमार्फत प्रस्ताव सादर करून दोन वर्ष संपत आले तरी नवीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली नाही़ त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारून बेजार होत आहेत़
४एकीकडे तालुक्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे़ असे होत असताना मजुरांच्या हाताला काम मिळणे आवश्यक होते़ परंतु, प्रशासकीय दिरंगाईचा फटका सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना बसत आहे़ याकडे सीईओंनी लक्ष देणे गरजेचे आहे़
रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या मंजूर झालेल्या प्रस्तावात त्रुटी आहेत़ यासाठी कर्मचारी वर्गाला सूचना देण्यात आल्या आहेत़
-धाबे, गटविकास अधिकारी, पालम