परभणी : निदर्शने, मोर्चाद्वारे घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:22 AM2018-08-12T00:22:28+5:302018-08-12T00:26:02+5:30
संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर ९ आॅगस्ट रोजी संविधानाची प्रत जाळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन संपूर्ण भारतीयांचा अवमान केला. या प्रकरणी देश विघातक कृत्य करणाºयांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर भीम आर्मी संघटनेचे जिल्हाप्रमुख कचरु गोडबोले, चंद्रकांत जोंधळे, प्रशांत ढगे, सुधाकर वाघमारे, विनोद जोंधळे, बुद्धपाल कांबळे, धम्मदीप मोगले, प्रमोद जोंधळे, मंगेश मस्के आदींची नावे आहेत.
रिपब्लिकन सेना
रिपब्लिकन सेनेनेही याच मागणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जिल्हाप्रमुख महेंद्र सानके, सुधाकर वाघमारे, अच्युतराव घुगे, बाबासाहेब हारबडे, चंद्रकांत लहाने, रमेश भिंगारे, शरद एडके, सुभाष गायकवाड, महेश घुगे, तुकाराम मुंढे आदींची नावे आहेत.
संविधानप्रेमी नागरिकांनी सेलूत काढला मोर्चा
सेलू- भारतीय राज्यघटनेच्या प्रती जाळणाºया आरोपींविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत संविधानप्रेमी नागरिकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून शनिवारी मोर्चा काढला़ मोर्चानंतर उपविभागीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर युथ ई क्वॉलिटी फाऊंडेशन व काही देशद्रोही संघटनांच्या पदाधिकाºयांनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या़ तसेच घटनेचे शिल्पकार डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली़ हा प्रकार संतापजनक असून, आंतरराष्ट्रीयस्तरावर मानहानी करणारा आहे़ या प्रकरणी आरोपींविरूद्ध राष्ट्रद्रोह तसेच रासुका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली़ यावेळी अॅड़विष्णू ढोले, मिलिंद सावंत, अशोक अंभोरे, विलास कांबळे, मोहन समिंद्रे, अॅड़हर्षवर्धन सोनकांबळे, बापू धापसे, आनंद साळवे, संजय भाग्यवंत, गौतम कनकुटे, अशोक पाईकराव, गौतम साळवे, शेख खलील, प्रदीप धापसे आदींसह संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते़