परभणी : आरोग्य सेवा पुरविताना कर्मचारी मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:30 AM2017-12-23T00:30:02+5:302017-12-23T00:30:39+5:30

मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील मनपाच्या रूग्णालयात रूग्णांची गर्दी होत असून आलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवितांना कर्मचाºयांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे़

Parbhani: Providing health care to the staff | परभणी : आरोग्य सेवा पुरविताना कर्मचारी मेटाकुटीला

परभणी : आरोग्य सेवा पुरविताना कर्मचारी मेटाकुटीला

googlenewsNext

चंद्रमुनी बलखंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील मनपाच्या रूग्णालयात रूग्णांची गर्दी होत असून आलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवितांना कर्मचाºयांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे़
परभणी महानगर पालिकेची शहरामध्ये पाच रूग्णालये आहेत़ यामध्ये एका युनानी दवाखान्यासह इतर नागरी दवाखाने आहेत़ मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये वातारणात बदल झाला आहे़ बुधवारी परभणी शहराचे तापमान ६ अंश सेल्सीअसवर पोहचले होते़ यामध्ये गुरूवारी आणखी घट झाली. वातारणातील बदलामुळे रूग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे़ या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील मनपाच्या चार रूग्णालयांची ‘लोकमत’ने पाहणी केली़ सकाळी ११़५० वाजता शहरातील खंडोबा मंदिर परिसरातील दवाखान्यास भेट दिली असता दवाखान्याच्या तीन खोल्यात वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते़ एका खोलीमध्ये ८ ते ९ महिला रूग्ण नाव नोंदणी करतांना दिसून आले़ तर महिला डॉक्टर रूग्णांची तपासणी करीत होत्या़ एका रूग्णास औषधी, गोळया आहेत का? अशी विचारणा केली असता औषधी मिळाली असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दुपारी १२़०५ वाजता लोकमान्य नगरातील ज्ञानेश्वर पाटीजवळील युनानी दवाखान्यास भेट दिली असता हा दवाखाना बंद असल्याचे दिसून आले़ परिसरातील एका दुकानदारास दवाखाना का बंद आहे, याची विचारणा केली असता दवाखाना आताच बंद झाला आहे़, अशी माहिती दिली़ आज शुक्रवार असल्याने लवकर बंद झाला असावा, असे या दुकानदाराने सांगितले. यानंतर जायकवाडी वसाहत परिसरातील कल्याण मंडपम् शेजारील मनपाच्या मुख्य दवाखान्यास दुपारी १२़ १५ वाजता भेट दिली़ यावेळी दवाखान्यात लसीकरण शिबीर सुरू असल्याचे दिसून आले़ लहान बालकांना घेऊन मातांनी गर्दी केली होती़ येथे डॉ़ कान्हेकर व डॉ़ सावंत हे बालकांना लस देत होते़ कर्मचाºयास औषधी साठा आहे का? अशी विचारणा केली असता, औषधी मूबलक असल्याचे सांगितले. याबाबत रूग्णांकडे विचारणा केली असता, मी आताच नोंदणी केली आहे़ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर औषधीचे सांगता येईल, असे त्याने सांगितले़ यानंतर दुपारी १२़३० वाजता खानापूर फाटा परिसरातील पिंगळी रोडवरील दवाखान्यास भेट दिली असता येथेही रूग्णांची गर्दी दिसून आली़ एका खोलीमध्ये लहान बालकांचे लसीकरण सुरू होते़ तर ७ ते ८ रूग्ण बाहेर थांबले असल्याचे दिसून आले़
धुळीचा करावा लागतो सामना
४शहरातील खंडोबा बाजार परिसर, पिंगळी रोेडवरील दवाखाने मुख्य रस्त्याच्या बाजुला आहेत. रस्त्याची दूरवस्था झाल्याने वाहनांमुळे प्रचंड धूळ निर्माण होत आहे. ही धूळ बाजुला असलेल्या दवाखान्यामध्ये जात आहे. दवाखान्याला केवळ कापडी पडदे आहेत. वाºयामुळे पडदे उडून धूळ दवाखान्यात जात आहे. याचा त्रास रुग्णांसह आरोग्य कर्मचाºयांनाही सहन करावा लागत आहे. अशीच स्थिती लोकमान्यनगरातील युनानी दवाखान्याची आहे. हा दवाखानाही रस्त्यालगत आहे. येथेही वाहनामुळे धूळ उडून दवाखान्यात जात आहे.

Web Title: Parbhani: Providing health care to the staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.