परभणी : प्रात्यक्षिकातून मतदान यंत्राची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:41 AM2018-12-25T00:41:59+5:302018-12-25T00:42:23+5:30
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील मतदान केंद्रांसह शाळा, महाविद्यालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी मतदान यंत्राची जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येक मतदाराने ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटविषयी माहिती जाणून घ्यावी, असे अवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील मतदान केंद्रांसह शाळा, महाविद्यालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी मतदान यंत्राची जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येक मतदाराने ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटविषयी माहिती जाणून घ्यावी, असे अवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदाराने कोणत्या उमेदवारास मतदान केले हे व्हीव्हीपॅटवर सात सेकंद दिसणार असल्याने मतदारांनी कशाप्रकारे मतदान करावे, निवडणुकीत ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅटचा वापर कसा होणार आहे, याविषयी मतदारांना माहिती दिली जात आहे. १८ डिसेंबर ते २० जानेवारी या काळात तालुक्यातील मालेवाडी, वाघलगाव, गोपा, नरळद, इरळद, धारखेड, मुळी, नागठाणा, सुनेगाव, सायळा, खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मैराळसावंगी, धारासूर, महातपुरी, महातपुरी तांडा, आनंदवाडी, शंकरवाडी, दत्तवाडी, शेंडगा, हरंगुळ, धनगरमोहा, उखळी खु., मानकादेवी, मरगळवाडी, भेंडेवाडी, टोकवाडी, सांगळेवाडी, मरगीळवाडी, वागदेवाडी, ढवळकेवाडी, गोदावरी तांडा, कौडगाव, धर्मनगरी, कासारवाडी, ईसाद, खंडाळी, बोथी, बोथी तांडा, वरवंटी, फुगनरवाडी, टाकळवाडी, कार्लेवाडी, घाटेवाडी, गौळवाडी, गौळवाडी तांडा, अरबुजवाडी, लिंबेवाडी, लिंबेवाडी तांडा, गुंजेगाव, घटांग्रा, घटांग्रा तांडा, अकोली, खादगाव, पोखर्णी वाळके, माखणी, सिरसम, डोंगरजवळा, खोकलेवाडी, चिलगरवाडी, सुप्पा खा., सुप्पा ज. कुंडगिरवाडी, पांगरी, बेलवाडी, बेलवाडी तांडा, शिवाजीनगर, दगडवाडी, पडेगाव, बनपिंपळा, मरडसगाव, विठ्ठलवाडी, मसनेरवाडी, इळेगाव, भांबरवाडी, दुस्सलगाव, रुमना, जवळा, राणीसावरगाव, कांगणेवाडी, उंबरवाडी, दामपुरी, निळानाईक तांडा, पिंपळदरी, सायबेटवाडी, बोर्डा, बडवणी, कातकरवाडी, डोंगरगाव, डोंगरपिंपळा, कोद्री, उंडेगाव, अंतरवेली, सेलमोहा, कड्याची वाडी, तांदुळवाडी, वाघदरी, आनंदवाडी, पिसेवाडी, झोला, पिंप्री, मसला आदी गावांत मतदार जागृती अभियान राबवून प्रत्येक मतदान केंद्रांवर तसेच शाळा, महाविद्यालयात तसेच सार्वजनिक ठिकाणी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले जाणार आहे.
आपण केलेले मतदान व्हीव्हीपॅटवर प्रत्यक्ष मतदाराला पाहता येणार असल्याने गावागावांत होणाऱ्या या मतदान प्रक्रियेची माहिती समजून घेण्यासाठी मतदारांनी जनजागृती अभियानात सहभाग नोंदवून आपल्या शंका कुशंकांचे निरसन करून घ्यावे, असे अवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वांभर गावंडे, सहायक मतदान नोंदणी अधिकारी तहसीलदार स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार यशवंतराव गजभारे, लिपिक किरण साखरे यांनी केले आहे.
निवडणूक विभागाच्या वतीने १८ डिसेंबर ते २० जानेवारी या काळात ठिकठिकाणी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.