परभणी : ४३४७ क्विंटलची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:53 PM2018-12-28T23:53:00+5:302018-12-28T23:54:07+5:30

जिल्ह्यातील ६ हमीभाव खरेदी केंद्राकडून ४ हजार ३४७ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६९० क्विंटल मूग, ४९० क्विंटल सोयाबीन तर १६७ क्विंटल उडदाची खरेदी करण्यात आली आहे. राज्य शासनाने मूग व उडीद खरेदीसाठी दिलेली २३ डिसेंबरची मुदत संपल्याने आता ५ जानेवारीपर्यंत केवळ सोयाबीनची हमीभाव खरेदी केंद्राकडून सुरु राहणार आहे.

Parbhani: The purchase of 4347 quintals | परभणी : ४३४७ क्विंटलची खरेदी

परभणी : ४३४७ क्विंटलची खरेदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ६ हमीभाव खरेदी केंद्राकडून ४ हजार ३४७ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६९० क्विंटल मूग, ४९० क्विंटल सोयाबीन तर १६७ क्विंटल उडदाची खरेदी करण्यात आली आहे. राज्य शासनाने मूग व उडीद खरेदीसाठी दिलेली २३ डिसेंबरची मुदत संपल्याने आता ५ जानेवारीपर्यंत केवळ सोयाबीनची हमीभाव खरेदी केंद्राकडून सुरु राहणार आहे.
यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातच पावसाने दगा दिल्यामुळे पिके हाती लागली नाहीत. जो शेतीमाल शेतकऱ्यांच्या पदरात पडला त्याला किमान हमीभाव मिळावा, अशी शेतकºयांची अपेक्षा होती. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली; परंतु, हमीभाव खरेदी केंद्र वेळेत सुरु झाले नाही. माल विक्री करण्यासाठी शेतकºयांकडे पुरेसा वेळ उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेक शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री करावी लागली. वारंवार मागणी करुनही हमीभाव खरेदी केंद्र सुरु होत नसल्याने अनेक शेतकºयांनी नोंदणी केल्यानंतरही खाजगी बाजारपेठेत शेतमाल विक्री केला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, परभणी, पालम, पाथरी व पूर्णा या सहा ठिकाणी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मूग व उडीद या शेतमालासाठी राज्य शासनाने २३ डिसेंबर रोजीची मुदत दिली होती. तर सोयाबीनच्या खरेदीसाठी ५ जानेवारीची अंतिम मुदत आहे. २३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये १९७७ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये ३ हजार ६६६ मूग, १६७ क्विंटल उडीद व ४९० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. खरेदी केंद्र उशिराने सुरु झाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतमाल खरेदीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांना शेतमाल भावतारण योजनेंतर्गत फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सोयाबीन खरेदीसाठी सेलू केंद्राला मुहूर्त सापडेना
सोयाबीन खरेदीसाठी राज्य शासनाने ५ जानेवारीची मुदत दिली आहे. ही मुदत संपण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आतापर्यंत परभणी केंद्रावर ६ शेतकºयांकडून ६३ क्विंटल ५० किलो, जिंतूर येथील २६ शेतकºयांकडून २६० क्विंटल ५० किलो, पालम ११ शेतकºयांकडून ११७ क्विंटल, पाथरी येथील केंद्रावर २ शेतकºयांकडून १२ क्विंटल ५० किलो, पूर्णा येथील केंद्रावर ६ शेतकºयांकडून ३८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सेलू येथील हमीभाव खरेदी केंद्राकडून आतापर्यंत एकाही शेतकºयाकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत कवडीमोल दराने शेतमालाची विक्री करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अशी झाली खरेदी
नाफेडकडून जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्राकडून २३ डिसेंबरपर्यंत मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये परभणी येथील केंद्रावर २७२ शेतकºयांचे ५९८ क्विंटल, जिंतूर केंद्रावर ६ शेतकºयांचे ७ क्विंटल ३० किलो, सेलू येथील ८६३ शेतकºयांचे १ हजार ७५२ क्विंटल, पालम येथील २३० शेतकºयांचे ४८३ क्विंटल, पाथरी येथील केंद्रावर २८६ शेतकºयांचे ६९४ क्विंटल ९७ किलो तर पूर्णा येथील हमीभाव खरेदी केंद्रावर १२१ शेतकºयांचे १३२ क्विंटल ६७ किलो अशी एकूण ३ हजार ६६७ क्विंटल ९४ किलो मुगाची खरेदी करण्यात आली आहे. त्याच बरोबर पूर्णा येथील केंद्रावर ९ शेतकºयांचे ८ क्विंटल ४३ किलो, पाथरी येथे १० शेतकºयांचे १९ क्विंटल २६ किलो, पालम येथे ३ शेतकºयांकडून ४ क्विंटल ५८ किलो, सेलू येथील २० शेतकºयांकडून ३८ क्विंटल ४८ किलो, जिंतूर येथे सर्वाधिक ६५ शेतकºयांकडून ९४ क्विंटल ४७ किलो तर परभणी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर केवळ एका शेतकºयाकडून २ क्विंटल ७५ किलो उडदाची खरेदी करण्यात आली आहे.

Web Title: Parbhani: The purchase of 4347 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.