परभणी : पूर्णा नदी झाली खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:58 PM2019-01-30T23:58:10+5:302019-01-30T23:58:35+5:30
प्रशासनाने अवैध वाळू उपशावर कितीही निर्बंध लादले तरीही तालुक्यातील वझर, येसेगाव, निलज, अंबरवाडी या भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर असलेली करडी नजर ढिली पडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या वाळू उपशाने पूर्णा नदी खड्डेमय झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : प्रशासनाने अवैध वाळू उपशावर कितीही निर्बंध लादले तरीही तालुक्यातील वझर, येसेगाव, निलज, अंबरवाडी या भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर असलेली करडी नजर ढिली पडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या वाळू उपशाने पूर्णा नदी खड्डेमय झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात एकाही वाळू धक्याचा लिलाव झाला नाही. त्यामुळे एकीकडे नागरिकांना वाळू मिळत नाही. तर दुसरीकडे चोरटी वाळू वाहतूक करणारे तालुक्यातील २० ते २५ वाळूमाफिया रात्रीच्या वेळी वाळू चोरी करून वाहतूक खुलेआम करीत आहेत. वझर येथील वाळू घाट तालुक्यात सर्वात मोठा आहे. येथील वाळुही चांगल्या दर्जाची असल्याने त्यास मागणीही मोठी आहे.
मात्र प्रशासनाने मागील सहा महिन्यांत केलेल्या कार्यवाहीमुळे वाळू चोरीला लगाम लागला होता; परंतुु, मागील दोन महिन्यांपासूून या घाटावरून ४ टिप्पर व ६ ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी वाळू उपसा करीत आहेत. विशेष म्हणजे ही वाळू नदीपात्रातून उपसा करून साठविली जाते. त्यानंतर तिची वाहतूक केली जाते. याच भागात वाळूचे ट्रॅक्टर धरल्यानंतर पोलिसांना मारहाण झाली होती. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरी सुरूच आहे. या भागात सहसा अधिकारी जात नाहीत. त्याचा फायदा हे वाळू माफिया घेत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक वाळूमाफियांची मोठी दादागिरी या भागात आहे.
वझर प्रमाणे निलज धक्यावरूनही मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे.
येथे स्वत:च जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दोन वेळा कार्यवाही केली होती. तरीही येथून वाळू उपसा सुरूच आहे. या भागातून वाळू सेनगाव, रिसोड, हिंगोली या भागात जात आहे. दररोज ८ ते १० टिप्पर भल्या पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करतात.
निलज येथून होणारी वाळू वाहतूक प्रशासन रोखू शकत नसल्याचे चित्र आहे.
खबरे बनताहेत मालामाल
४प्रशासनाच्या कार्यवाहीची भीती असल्याने वाळूमाफिया रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी रोजंदारीवर चौकीदार उभे करीत आहेत.
४शिवाय प्रशासनातील एखाद्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून अधिकाºयाचे लोकेशन घेतले जात आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे वझर व निलजकडे अशा व्यक्ती जास्त पहावयास मिळतात.
रस्त्यावर वाळूचे ढिगारे
४तालुक्यातील वझर, निलज प्रमाणे करपरा नदीतूनही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे.
४येसेगाव येथून दररोज १० ते १५ ट्रॅक्टरचा वाळू उपसा केला जातो. तर अंबरवाडी येथील ओढ्यातूनही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. याकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
प्रशासन कार्यवाही करीत आहे. आमचे बारकाईने लक्ष आहे. मागील आठवड्यात ६ ते ८ ट्रॅक्टर पकडले असून आपण स्वत: याकडे लक्ष देऊन कार्यवाही करू.
-सुरेश शेजूळ, तहसीलदार