परभणी : सायकल मोहिमेतून मांडले एड्सबाधितांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:56 AM2018-12-03T00:56:37+5:302018-12-03T00:57:24+5:30

एचआयव्ही बाधित अनाथ मुुलांच्या मूलभूत प्रश्नांवर जनजागरण करीत येथील डॉ.पवन चांडक यांनी पुणे- अष्टविनायक-पुणे अशी ७०० कि.मी. अंतराची सायकलवारी कोणत्याही बॅकअप्शिवाय पूर्ण केली आहे.

Parbhani: Question about AIDS-related issues raised from cycle campaign | परभणी : सायकल मोहिमेतून मांडले एड्सबाधितांचे प्रश्न

परभणी : सायकल मोहिमेतून मांडले एड्सबाधितांचे प्रश्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: एचआयव्ही बाधित अनाथ मुुलांच्या मूलभूत प्रश्नांवर जनजागरण करीत येथील डॉ.पवन चांडक यांनी पुणे- अष्टविनायक-पुणे अशी ७०० कि.मी. अंतराची सायकलवारी कोणत्याही बॅकअप्शिवाय पूर्ण केली आहे.
२५ नोव्हेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावरुन डॉ.चांडक यांनी सायकल प्रवासाला सुरुवात केली. थेऊर, जेजुरी, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड मार्गे पाली येथे ही सायकल यात्रा पोहचली. परतीच्या प्रवासात खापोली, लोणावळा, देहू, आळंदी, धायरीमार्गे ३० नोव्हेंबर रोजी पुणे येथे समारोप झाला. ७०० कि.मी. अंतराच्या सायकल प्रवासात चांडक यांनी पुणे, अहमदनगर, नाशिक, अलीबाग या चार जिल्ह्यातून सह्याद्रीच्या पर्वतरांगातून अवघड असलेले रस्ते, खंडाळा घाट मार्गाने प्रवास केला. या दरम्यान विविध सामाजिक संस्था, सायकलग्रुप, रोटरी क्लब, आनंदवन, सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरार्थी मित्र परिवार आदींच्या वतीने आयोजित एडस् जनजागृती कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले. एडस्बाधित बालकांच्या पुनर्वसनासाठी मदतीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. २८ नोव्हेंबर रोजी खालापूर पंचायत समिती येथील बचतगट सदस्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. २९ नोव्हेंबर रोजी पालवाला महाविद्यालयात रासेयोच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच दिवशी पिंपरी चिंचवड येथे पोहचून निसर्ग सायकलमित्र ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधला. इन्डो सायलिस्ट क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
विविध ठिकाणी जनजागृती
४या सायकल मोहिमेदरम्यान चांडक यांनी विविध ठिकाणी विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, युवक आदी घटकांशी संवाद साधून एचआयव्ही एडस् बाधित मुलांचे शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन हे प्रश्न समजावून सांगितले. या विद्यार्थ्यांच्या पूनर्वसनासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या मोहिमेदरम्यान लोकेश लाटे, प्रा.जगताप, शितोळे, संजय चौधरी, रामा अभंग, सुदर्शन कांबळे, ओंकार काजळे, जयवंत गायकवाड, प्रमोद जाधव, मारोती पवार यांचे सहकार्य लाभल्याचे चांडक यांनी सांगितले.

Web Title: Parbhani: Question about AIDS-related issues raised from cycle campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.