परभणी : दुधनाच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:55 PM2019-05-09T23:55:37+5:302019-05-09T23:56:15+5:30
निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासह चारा, टँकर, विहीर, बोअर अधिग्रहण आदी प्रश्न जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासह चारा, टँकर, विहीर, बोअर अधिग्रहण आदी प्रश्न जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मे रोजी मुंबईत दुष्काळ आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान परभणी जिल्ह्यातील ३३ सरपंचांसह ग्रामसेवक, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी त्यांनी आॅडिओ कॉन्फ्रन्स कॉलच्या माध्यमातून संवाद साधत जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडावे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, विहीर, बोअर अधिग्रहण झाले नाही, रोहयोची कामे सुरु करावीत, चारा छावण्या सुरु कराव्यात, जायकवाडीचे पाणी मुद्गल बंधाºयात सोडावे, अधिग्रहणाच्या जाचक अटी रद्द कराव्यात, मुळी बंधाºयाला दरवाजे बसवावेत, साखर कारखान्यांकडे थकित असलेले पैसे आदी विविध प्रश्न सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. या संवादादरम्यान सेलू तालुक्यातील राव्हा येथील सरपंच रमेश शिंदे यांनी टँकर मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत, अशी मागणी केली.
या संवादा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळाची नोंद घेऊन उपाययोजना सुरु केल्या आहेत. शया उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होत आहे का, याची माहिती घेण्यासाठी सरपंचांशी संवाद साधला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने टँकरची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. अधिग्रहित विहिरींचे देयके पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार दिली जाणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठी २ कोटी २६ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरु झाली नसली तरी आवश्यक त्या ठिकाणी शासकीय चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यातील या सरपंचांनी साधला संवाद
च्जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील वैजनाथ कदम, बेलोरा येथील सीमा कदम, सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथील चंद्रभागा वाघमारे, रवळगाव येथील राधिका रोडगे, राव्हा येथील रमेश शिंदे, राजूर येथील विलास शेवाळे, सेलवाडी येथील सोळंके, बोरकिनी येथील शोभा ढाले, मानवत तालुक्यातील करंजीचे सुभाष जाधव, रामेटाकळी येथील सुशिला काळे, भोसा येथील संजय प्रधान, सोमठाणा येथील राजाराम कुकडे, पाथरी तालुक्यातील उमरा येथील दत्ता बिनोळे.
च् मुद्गल येथील सुमित्रा केंद्रे, मंजरथ येथील अंगद काळे, हादगाव येथील सीमा नखाते, गोपेगाव येथील सुदामती गिराम, सोनपेठ तालुक्यातील कोरटेक येथील मनिषा सूर्यवंशी, वाडी पिंपळगाव येथील अमरदीप नागरे.
च् गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी येथील मीनाक्षी जाधव, महातपुरी येथील प्रदीप शिंदे, धनगर मोहा येथील सारिका खांडेकर, अंतरवेली येथील सीताबाई मुंडे, पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील शेख कादर याकूब, नाव्हलगाव येथील संगीता मुलगीर, लांडकवाडी येथील मारोती माने, पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील गणेश काळे, दगडवाडी येथील बालाजी वाघमारे, माटेगाव येथील कलाबाई कºहाळे.
च् परभणी तालुक्यातील परवीन पटेल, सोन्ना येथील तारामती दंडवते, शिर्शी बु. येथील रोहिणी जाधव, साळापुरी येथील सतीश घाटगे आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधून दुष्काळाच्या अनुषंगाने आपल्या भागातील समस्या मांडल्या.