परभणी : रेल्वेची विकासकामे संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:51 PM2018-03-11T23:51:16+5:302018-03-11T23:51:49+5:30
येथील रेल्वेस्थानकावरील विकासकामे संथगतीने सुरू असून, प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यापासून सुरू असलेले सरकता जीना उभारणीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. तसेच लोकेटरसह इतर कामांना मुहूर्तही लागत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वेस्थानकावरील विकासकामे संथगतीने सुरू असून, प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यापासून सुरू असलेले सरकता जीना उभारणीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. तसेच लोकेटरसह इतर कामांना मुहूर्तही लागत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़
परभणी हे नांदेड विभागातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून, दक्षिण-मध्य रेल्वेच्या आदर्श रेल्वे स्थानकामध्ये परभणीचा समावेश आहे़ वर्षभरापूर्वी या स्थानकावर सरकता जीना बसविण्यासासाठी साहित्यही उपलब्ध झाले होते. परंतु, रेल्वे प्रशासनाने हे साहित्य इतर ठिकाणी नेल्याने सरकत्या जीन्याचे काम रेंगाळले होते़ रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवाशांचा दबाव वाढल्यानंतर साधारणत: दोन महिन्यापूर्वी सरकता जीना बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली़ पोलीस चौकीच्या समोरील दादºयावर हा जीना बसविला जात आहे़ मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे़ काम सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरीही एका बाजुचा सरकता जीनाच पूर्ण झाला नाही़
स्वच्छतागृहाचाही अभाव
प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते़ अनेक वेळा रेल्वे गाड्याची वाट पाहत प्रवाशांना थांबावे लागते़ परंतु, या प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने प्रवाशांची कुचंबना होत आहे़ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील अर्धा भार प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर टाकण्यात आला़ परंतु, त्या तुलनेत या प्लॅटफॉर्मवर सुविधा उपलब्ध केल्या नाहीत़
कोच लोकेटर बसविण्याचे काम रखडले
प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच लोकेटर नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ औरंगाबाद, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे़ अनेक प्रवासी आरक्षण करून हा प्रवास करतात़ परंतु, कोच लोकेटर नसल्याने आरक्षित डबा नेमका कुठे येणार? याची माहिती प्रवाशांना मिळत नाही़ स्थानकावर अनाऊसिंग करून ही माहिती दिली जात असली तरी ती व्यवस्थित समजत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ रेल्वे गाडी स्थानकामध्ये दाखल झाल्यानंतर प्रवाशांना धावपळ करावी लागते़ यात अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़