परभणी : तालुक्यात बहरलेल्या पिकांना पावसाची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:33 PM2019-08-17T23:33:49+5:302019-08-17T23:34:47+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर तालुका कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले होते़ तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे़ पेरणी केलेली पिके पूर्णपणे बहरात आहेत़ या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे; परंतु, पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ या महिन्यातील पाऊस पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढविणाराच आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर तालुका कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले होते़ तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे़ पेरणी केलेली पिके पूर्णपणे बहरात आहेत़ या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे; परंतु, पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ या महिन्यातील पाऊस पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढविणाराच आहे़
परभणी तालुक्यात सर्वसाधारणपणे नगदी पीक म्हणून ओळखले जाणाºया कापूस व सोयाबीन पिकांची सर्वाधिक पेरणी केली जाते़ काळ्या मातीने सुजलाम् सुफलाम असलेला हा तालुका सिंचनात मागे पडलेला आहे़ या तालुक्यातून दूधना, पूर्णा या प्रमुख नद्या प्रवाही आहेत; परंतु, गतवर्षी दुष्काळामुळे हिवाळ्यात या नद्यांचे पात्र कोरडेठाक पडले़ परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या निम्न दूधना प्रकल्पातून या दोन्ही उपद्यांच्या पात्रात पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे यावर्षीच्या जूनपर्यंत नदीकाठावरील ग्रामस्थांची तहान व काही प्रमाणात सिंचनाचा प्रश्न मिटला़
यावर्षी खरीप हंगामात शेतकºयांनी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर पेरणी करण्यास सुरुवात केली़ ५ आॅगस्टपर्यंत तालुका कृषी विभागाने नियोजन केलेल्या १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली़ यामध्ये तूर १२ हजार ५५८, मूग ५३ हजार ५७ हेक्टर, उडीद ६ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ त्याचबरोबर सोयाबीन ४८ हजार २५७, कापूस ३७ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आला आहे़ पेरणी केलेली पिके कमी अधिक पावसावर बहरली आहेत़ कापसाची चांगली वाढ झाली आहे तर सोयाबीन पीक शेंगा व फुल लागण्याच्या अवस्थेत आहे़ या पिकांना सध्या पावसाची नितांत आवश्यकता आहे; परंतु, मागील आठ दिवसांत तालुक्यात पावसाचा एक थेंबही बरसला नाही़ त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांची पिके जरी चांगली असली तरी पावसाची प्रतीक्षा मात्र पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यानंतरही कायम आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांच्या नजरा दमदार पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत़
सिंचनासोबत जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर
परभणी तालुक्याची पावसाची सरासरी ८६२़६० मिमी आहे़ १ जूनपासून ते १६ आॅगस्टपर्यंत तालुक्यात केवळ २४५़४६ मिमी पाऊस झाला आहे़ टक्केवारीच्या तुलनेत तालुक्यात आजपर्यंत ४८़ ६० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते; परंतु, १७ आॅगस्टपर्यंत तालुक्यात केवळ ३०़६ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरीही १८ टक्के पाऊस कमी झाला आहे़ त्यामुळे तालुक्यात शेती सिंचनाबरोबराच जनावरांच्या चाºयाचा व तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्याचबरोबर मध्यम लघु प्रकल्पासह दूधना व पूर्णा या प्रवाही नद्यांच्या पात्रातही एक थेंब पाणी नाही़ उरलेल्या दोन महिन्यांत पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली तरच हे प्रश्न निकाली निघणार आहेत़ अन्यथा तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़