परभणी : सलग चौथ्याही दिवशी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:19 AM2018-06-12T00:19:31+5:302018-06-12T00:19:31+5:30
चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे़ सतत पाऊस होत असला तरी अजूनही बहुतांश ठिकाणी शेतकरी पेरण्यांसाठी सरसावलेला नाही़ मोठा पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांना प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे़ सतत पाऊस होत असला तरी अजूनही बहुतांश ठिकाणी शेतकरी पेरण्यांसाठी सरसावलेला नाही़ मोठा पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांना प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे़
चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे़ दररोज रात्री कमी अधिक प्रमाणात जिल्हाभरात पावसाची हजेरी लागत आहे़ रविवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास परभणी शहरासह तालुक्यात पाऊस झाला़ जिल्ह्यातही सर्वच तालुक्यांमध्ये रात्री पावसाला प्रारंभ झाला़ समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे़
११ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाभरात सरासरी २८़४३ मिमी पाऊस झाला आहे़ आतापर्यंत १११़२४ मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या १४़३६ टक्के पावसाची नोंद घेण्यात आली आहे़ १ जूनपासून ते आतापर्यंत समाधानकारक पाऊस असल्याने शेतकºयांमध्ये उत्साह आहे़ नदी, नाले वाहते झाले आहेत़ शेतकºयांनी कापूस लागवड सुरू केली असली तरी पेरण्यांसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे़
अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस
परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांची तुलना करता १० जूनपर्यंत सरासरी ४६़४२ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे; परंतु, प्रत्यक्षात या कालावधीत ८२़८२ मिमी पाऊस झाला आहे़ अपेक्षित पावसाच्या २३९ टक्के पाऊस अधिक झाला आहे़ पावसाची ही आकडेवारी समाधानकारक असली तरी जून महिन्याच्या तिसºया आठवड्यात पावसाचा खंड पडेल, असा अंदाज वर्तविला जात असल्याने शेतकरी पेरण्यांसाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे़