परभणी :६२ टक्के पाऊस होवूनही साठा वाढेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:08 AM2018-09-27T00:08:46+5:302018-09-27T00:09:58+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६२़३० टक्के पाऊस होवूनही प्रमुख तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत नसल्याने भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते की, काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६२़३० टक्के पाऊस होवूनही प्रमुख तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत नसल्याने भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते की, काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़
परभणी जिल्ह्यात सरासरी ७७४़६२ मिमी पाऊस होत असतो़ त्यानुसार यावर्षीही समाधानकारक पाऊस राहील, असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले होते़ त्यामुळे सातत्याने दुष्काळाच्या भीतीने दडपणाखाली राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल, असे वाटत होते; परंतु, पावसामध्ये सातत्याने खंड पडत असल्याने जमिनीमध्ये पाणी मुरले नाही़ परिणामी पाणीसाठ्यामध्ये वाढच होत नसल्याची स्थिती जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६२़३० टक्के पाऊस झाला आहे़ त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ८९़७० टक्के पाऊस पूर्णा तालुक्यात झाला आहे़ त्या खालोखाल सोनपेठ तालुक्यात ६२़७० टक्के, जिंतूर तालुक्यात ६२़३० टक्के, मानवत तालुक्यात ६१़८० टक्के, गंगाखेड तालुक्यात ६०़२० टक्के, परभणी तालुक्यात ५९़२० टक्के, पालम तालुक्यात ५८़४० टक्के, सेलू तालुक्यात ५६़८० टक्के आणि पाथरी तालुक्यात ५३ टक्के पाऊस झाला आहे़ पावसाची टक्केवारी पाहता जलसाठ्यांमध्ये समाधानकारक पाणी असेल, असे वाटते; परंतु, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे़ पावसामध्ये सातत्य राहिले नसल्याने पडलेले पाणी जमिनीमध्ये मुरले नाही़ परिणामी पाणी पातळीत वाढ झाली नाही़ याचा जलसाठ्यावर परिणाम झाला आहे़
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात सद्यस्थितीत फक्त ९़२३ टक्के पाणीसाठा आहे़ गतवर्षी या धरणात यावेळेला १०़२१ टक्के पाणी होते़ निम्न दूधना प्रकल्पात गतवर्षी तब्बल ७०़६२ टक्के पाणीसाठा होता़ आता फक्त २४़६७ टक्के पाणीसाठा आहे़ मासोळी प्रकल्पात गतवर्षी १४ टक्के पाणी होते, आता फक्त १० टक्के पाणीसाठा आहे़ पिंपळदरी तलावात गतवर्षी २७़६५ टक्के पाणीसाठा होता़ आता फक्त ५़८९ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक आहे़ याशिवाय मानवत तालुक्यातील झरी येथील प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठा आहे़ गतवर्षी येथे १०० टक्के पाणीसाठा होता़ डिग्रस बंधाºयात सद्यस्थितीत ६७ टक्के पाणीसाठा आहे़ गतवर्षी येथे ५० टक्के पाणीसाठा होता़ तर मुदगल बंधाºयात ८० टक्के पाणीसाठा आहे़ या बंधाºयात गतवर्षी यावेळी ८६ टक्के पाणीसाठा होता़ ढालेगाव बंधाºयात सद्यस्थितीत ९६ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी येथे यावेळेला ९८ टक्के पाणीसाठा होता़
पावसाची : गरज
जिल्ह्यात परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही़ गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे़ या अनुषंगाने सोमवारी मध्यरात्री परभणी जिल्ह्यात सरासरी ६़२९ टक्के पाऊस झाला़ त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे २० मिमी पाऊस पालम तालुक्यात झाला़ परभणी शहरातही १०़५० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ असे असले तरी शहरातील एका भागात पाऊस होत आहे व दुसरा भाग कोरडा राहत आहे़
त्यामुळे महसूलच्या पावसाची नोंद घेणाºया यंत्राच्या ठिकाणी पाऊस झाला तर त्याची महसूलकडे नोंद होते; परंतु, त्याच कार्यालयाच्या पलीकडील बाजुला पाऊसच होत नाही़ अशा वेळी महसूलकडून पावसाच्या नोंदी शासनाकडे जातात; परंतु, प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी असते़ त्यामुळे जिल्ह्याला आणखी सर्वदूर व मोठ्या परतीच्या पावसाची आवश्यकता आहे़ परतीचा पाऊस चांगल्या झाल्यावरच खरीप हंगामात शेतकºयांचे झालेले नुकसान रबी हंगामात भरून निघणार आहे़ अन्यथा जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद राहणार आहे़