परभणी : महिलांच्या सन्मानार्थ रॅली, प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:40 AM2019-03-09T00:40:07+5:302019-03-09T00:40:25+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी दिवसभर जिल्हाभरात महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा यानिमित्ताने गौरव करुन स्त्री शक्तीला अभिवादन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी दिवसभर जिल्हाभरात महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा यानिमित्ताने गौरव करुन स्त्री शक्तीला अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रशासकीय इमारत परिसरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारी आदींचा सहभाग होता. तसेच गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींचे लेझीम पथक आकर्षण होते. रॅलीमध्ये सर्व महिलांनी फेटे परिधान केले असल्यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्षा भावनाताई नखाते, जि.प.सदस्या अरुणा काळे आदींची उपस्थिती होती. यावेळी महिलांसाठी लावणीच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
ल्लअक्षरनंदनमध्ये स्पर्धा
शहरातील अक्षरनंदन इंग्रजी शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, रांगोळी, डिश डेकोरेशन आदी स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धामध्ये विजेत्या मनिषा पतंगे, वंदना भिसे, अश्लेषा निळे, जयश्री गोसावी या महिलांना साड्या भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी तवार, संगिता काकडे आदींची उपस्थिती होती.
ल्लप्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल
शहरातील प्रेसेडेन्सी इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महिला शिक्षकांचा व शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संध्या तारे, सोनाली चौधरी, महेश शेळके, मो.आर्शद कादरी, बालाजी बुधवंत, पवन फुलपगार, डिगंबर भोसले यांची उपस्थिती होती. कोमल चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर विजेता गोटे यांनी आभार मानले.
ल्लसंत दामाजीअप्पा विद्यालय
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका जयश्री रणेर या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उषा लहाने, रेणुका पांचाळ यांची उपस्थिती होती. महिला दिनानिमित्त विद्यालयातील तेजस भोसले, गणेश भोसले, अक्षरा मंदिलवाल, गीता दळवी, प्रेम सुक्रे, सुरज बेले, संजय वैरागर, सुमित बेले, श्रावणी लोखंडे, वैष्णवी लोखंडे, शेख कलिमा पूजा गव्हाणे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. श्रावणी लोखंडे यांनी सूत्रसंचालन तर अंगद दुधाटे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रा.विष्णू वैरागर, प्रा.प्रताप बेले, मुख्याध्यापक रामदास दळवे, प्रा. चोपडे, प्रा. बिंडे यांनी प्रयत्न केले.
ल्लसंस्कृती विद्यानिकेतन
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सरोज देसरडा या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून रुपाली कौसडीकर यांची उपस्थिती होती. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जगदीश जोकसने यांनी सूत्रसंचालन केले.
शिवाजी महाविद्यालयात वीर माता, वीर पत्नींचा गौरव
येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात वीर माता व वीर पत्नींचा गौरव समारंभ घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांची तर व्यासपीठावर प्राचार्य संध्याताई दुधगावकर, विजश्री पाथरीकर, वनिता चव्हाण, केशव दुधाटे, नारायण चौधरी, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, आनंद पाथरीकर, विष्णू वैरागड, प्रमोद दलाल आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नखाते म्हणाल्या की, सकारात्मक दृष्टीकोनातून महिलांनी संकटाला सामोरे गेले पाहिजे. यावेळी डॉ.दुधगावकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्वाती विभूते यांनी तर सूत्रसंचालन मयुरी जोशी, नेहा मुंडलिक यांनी केले. आभार प्रा.रोकडे यांनी मानले.
सरस्वती धन्वंतरी महाविद्यालयात शिबीर
शहरातील पाथरीरोडवरील सरस्वती धन्वंतरी महाविद्यालय व रुग्णालय येथे यानिमित्त ‘गर्भाशयाचा कर्करोग: प्रतिबंध व उपाय’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सचिव तथा नगरसेविका डॉ.विद्याताई प्रफुल्ल पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच प्रा.सीमा मीना यांनी सायबर गुन्हे व सोशल मीडियाचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय निलावार, संचालिका डॉ.उज्ज्वला माखणे, विभागप्रमुख डॉ.अर्चना जटानिया, डॉ.नम्रता पाटील, डॉ.विनिता मुरगोड, डॉ.सोनिया निरस यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा महसूल कर्मचारी संघटना व जिल्हा महिला दुर्गामंच यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सीईओं बी.पी.पृथ्वीराज यांची उपस्थिती होती. यावेळी भारतीय स्टेट बँकेच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बँकेच्या वतीने कर्मचाºयांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन लक्ष्मण खळीकर यांनी तर आभार प्रदर्शन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी केले. कार्यक्रमास प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी सुकेशनी पगारे, स्वाती सूर्यवंशी, सूचिता शिंदे, तहसीलदार टेमकर, उपायुक्त विद्या गायकवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापन हट्टेकर आदींची उपस्थिती होती.