परभणी : सेवानिवृत्त सैनिकांच्या रॅलीस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:53 AM2019-02-04T00:53:36+5:302019-02-04T00:54:01+5:30
भारतीय सेनेच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त सैनिकांसाठी काढलेल्या रॅलीला परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारतीय सेनेच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त सैनिकांसाठी काढलेल्या रॅलीला परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़
येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रविवारी सकाळी चिफ कमांडर ब्रिगेडिअर डीक़े़ पात्रा, कर्नल कौशिक रे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, माजी मेजर राहुल आंबेगावकर, ले़ कर्नल ओंकार, कर्नल हरमिंदर सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले़
त्यानंतर आयोजित मेळाव्यामध्ये माजी सैनिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले़
कार्यक्रमात वीर पत्नी शारदा तेलभरे, अर्चना गणेश चिमेवार, मनकर्णिका जनार्धन मुंडे, गंगासागर ज्ञानोबा कराड, अनुराधा गणेश शहाणे, वीरमाता सुनिता सुधाकर गोडबोले, वीर पत्नी अंजली बालाजी अंबोरे, वीर माता सुनिता सूर्यकांत मुस्तापुरे, लक्ष्मी भिकाजी रणवीर यांचा सत्कार करण्यात आला़ तसेच कार्य बजावताना १०० टक्के पाय निकामी झालेले शिपाई कारभारी कोरडे यांना स्कुटर भेट देण्यात आली़ आर्मी रिकोर्ड आॅफीस बँक, सेना प्लेसमेंट नोट, जिल्हा सैनिक बोर्ड, विविध रेकॉर्ड आॅफीस आणि दोन्ही जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते़ मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद मिल्ट्री कॅटच्या वतीने सैनिकांनी प्रयत्न करण्यात आले.
अडचणी घेतल्या जाणून
माजी सैनिकांसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यात भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी माजी सैनिकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़ माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित स्थानिक अधिकाºयांनाही सैन्य दलातील अधिकाºयांनी सूचना केल्या आहेत़