परभणी : कापसाचे दर वाढले अन् उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:25 AM2018-10-31T00:25:00+5:302018-10-31T00:25:38+5:30

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.

Parbhani: The rate of cotton increased and the production declined | परभणी : कापसाचे दर वाढले अन् उत्पादन घटले

परभणी : कापसाचे दर वाढले अन् उत्पादन घटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.
पालम तालुक्यात यावर्षी कापसाच्या लागवडीत घट झाली आहे. मागील वर्षी बोंडअळीचा हल्ला झाल्याने यावर्षी शेतकºयांनी पिकाकडे पाठ फिरविली आहे. जेमतेम १० हजार हेक्टवर कापूस पिकाची लागवड झाली होती. सुुरुवातीला पिकांची स्थिती जोमदार होती. मात्र तालुक्यात २० आॅगस्टपासून जवळपास दोन महिने पावसाचा खंड पडल्याने कापूस पीक सुकू लागले. तसेच मर रोगाची लागण झाल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची झाडे वाळून गेली.
पावसाअभावी कापूस पिकावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने पिके उगवलीच नाहीत. कापसाला ६ हजार रुपयांपासून प्रती क्विंटल भाव मिळत आहे; परंतु, कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
त्यामुळे शेतकºयांकडे कापूसच नाही. दुष्काळात पिकांनी साथ सोडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे भावात वाढ झाली असली तरी उत्पादनात मात्र मोठी घट झाल्याने पालम तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

पीक विम्याची : शेतकºयांना आशा
४खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे. शेतकºयांनी कापूस पिकावर हजारो रुपये खर्च करून पीक विमा उतरविला आहे. यावर्षी हे पीक हातून गेले आहे. त्यामुळे पीक विमा संरक्षण मिळणे गरजेचे असून शेतकºयांना विम्याची आशा आहे. कंपनी, सरकारी अधिकारी काय कागदी घोडे नाचवितील, याची भिती शेतकºयांतून व्यक्त केली जात आहे.
नुकसानीची
दखल घेतली नाही
४कापूस पिकावर मर रोग व बोंडअळीचा हल्ला झाल्याने यावर्षी कापसाचे पीक उधद्वस्त झाले आहे. शेतकरी नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी करीत आहेत;परंतु, शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकºयांना वाईट दिवस आले आहेत. निसर्गाने झटका दिलेल्या शेतकºयांना शासनानेही वाºयावर सोडल्याची स्थिती दिसून येत आहे.
४त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी, नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना नुकसानीनुसार भरपाई द्यावी, अशी मागणी पालम तालुक्यातील शेतकºयांच्या वतीने केली जात आहे.

Web Title: Parbhani: The rate of cotton increased and the production declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.