स्वच्छता अभिमानात परभणीला मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:45 PM2019-11-14T23:45:25+5:302019-11-14T23:46:01+5:30

हागणदारीमुक्त असलेल्या परभणी शहरातील शाळा, महाविद्यालय, दवाखाने आणि शासकीय कार्यालयामंध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध असल्याने केंद्राच्या पथकाने परभणी शहराला ओडीएफ प्लस (ओपन डेफेसेशन फ्री) हा दर्जा दिला आहे. गुरुवारी महापालिकेला केंद्रस्तरीय पथकाने ही माहिती दिली.

Parbhani is rated proud of cleanliness | स्वच्छता अभिमानात परभणीला मानांकन

स्वच्छता अभिमानात परभणीला मानांकन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : हागणदारीमुक्त असलेल्या परभणी शहरातील शाळा, महाविद्यालय, दवाखाने आणि शासकीय कार्यालयामंध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध असल्याने केंद्राच्या पथकाने परभणी शहराला ओडीएफ प्लस (ओपन डेफेसेशन फ्री) हा दर्जा दिला आहे. गुरुवारी महापालिकेला केंद्रस्तरीय पथकाने ही माहिती दिली.
स्वच्छ भारत २०२० अंतर्गत परभणी शहरात स्वच्छतेची कामे केली जात आहेत. शहरातील सार्वजनिक हागणदारीची स्थळे मागील वर्षीच्या अभियानातच निष्काशित केल्याने परभणी शहर हागणदारीमुक्त ठरले होते. यावर्षी स्वच्छता अभियान राबविताना मनपाने शहर स्वच्छतेची अनेक कामे केली. सर्व आवश्यक त्या सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची सुविधा उपलब्ध केली आहे. या अभियानांतर्गत केंद्राच्या पथकाने १ व २ नोव्हेंबर रोजी परभणीत पाहणी दौरा केला होता. त्यावेळी शहरातील सार्वजनिक ठिकाणांबरोबरच शाळा, महाविद्यालय, दवाखाने, शासकीय कार्यालयांमध्ये शौचालयाची सुविधा असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, सॅनिटी पॅड व्हेंडींग मशीन, आरसा व इतर सुविधा उपलब्ध असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या पथकाच्या अहवालावरुन १३ नोव्हेंबर रोजी महाराष्टÑ शासनाने परभणी शहराला ओडीएफ प्लस घोषित केले आहे. शासनाचे सर्व निकष पूर्ण करुन परभणी शहराला ओडीएफ प्लस प्लस हा दर्जा मिळवायचा आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या चळवळीत सर्व यंत्रणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी केले.

Web Title: Parbhani is rated proud of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.