परभणी : रेशन दुकान बंद; लाभार्थ्यांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:04 AM2019-01-29T01:04:03+5:302019-01-29T01:04:29+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रेशन दुकान बंद झाल्याने येथील लाभार्थ्यांना दोन महिन्यांपासून रेशन मिळत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करुन लाभार्थ्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रेशन दुकान बंद झाल्याने येथील लाभार्थ्यांना दोन महिन्यांपासून रेशन मिळत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करुन लाभार्थ्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.
प्रभाग ४ मध्ये प्रताप शिंदे यांचे रेशन दुकान बंद झाले आहे. त्यामुळे ६०० लाभधारकांची दोन महिन्यांपासून हेळसांड होत आहे. शासन नियमित धान्य पुरवठा करीत असताना लाभार्थ्यांना मात्र धान्य मिळत नाही. या प्रभागातील लाभार्थ्यांना खानापूर येथील दुकानदाराकडे जोडून दिले असल्याची माहिती आहे. मात्र दुकानाचे अंतर जवळपास २ कि.मी.एवढे आहे. प्रभाग क्रमांक ४ आणि खानापूर यामध्ये महामार्ग असल्याने लाभार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये इतर तीन रेशन दुकान असून त्यापैकी एका दुकानाला लाभार्थ्यांना जोडावे व लाभार्थ्यांची गैरसोय दूर करावी अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर महिला राकॉंच्या शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, संगीताताई पवार, शोभा कांडनगीरे, कमलबाई कासले, मीरा कोरे, उषा शेळके, प्रेमकला कांडनगिरे, उज्ज्वला राठोड, रंजना सोनवणे, रुख्मिणी ढगे, कांताबाई कुकडे आदींची नावे आहेत.