परभणी : टंचाई कामांचा दोन कोटींचा निधी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:47 AM2019-02-17T00:47:05+5:302019-02-17T00:47:31+5:30
मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़
ग्रामीण व नागरी भागातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत टंचाईकृती आराखडा मंजूर करून कामे केली जातात़ मागील वर्षी जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्या काळात जिल्हा परिषदेने टंचाई निवारणाची अनेक कामे हाती घेतली़ या कामांच्या खर्चापोटी जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी करण्यात आली होती़ हा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आला़ विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपयांचा निधी नुकताच वितरित करण्यात आला आहे़
मागील वर्षी जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली होती़ अनेक गावांमध्ये जलस्त्रोत आटल्याने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणाची कामे हाती घेतली़ जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, नळ योजनांची दुरुस्ती ही कामे केली़ दरम्यान, टंचाई निवारणाची कामे घेतली असली तरी त्यावर झालेल्या खर्चाला अद्याप मंजुरी मिळाली नव्हती़ त्यामुळे कोट्यवधीची देयके थकीत होती़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला़ त्यास तब्बल एक वर्षानंतर मंजुरी मिळाली असून, हा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आला आहे़ निधी वितरित करताना जिल्हाधिकाºयांनी जि़प़ला काही सूचनाही केल्या आहेत़ त्यामध्ये ज्या प्रायोजनासाठी निधीची मागणी नोंदविली, त्याच उपाययोजनांसाठी खर्च होईल, याची दक्षता घ्यावी़ हा निधी प्रपंजी लेखाखाते अथवा बँक खात्यात न ठेवता थेट कंत्राटदारांना वितरित केला जाईल, याची दक्षता घ्यावी़ निधीचे वितरण करताना यापूर्वी संबंधित योजनांना निधी वितरित झाला नाही, याची खात्री करावी़ शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या सुरुवातीस ५० टक्के आणि योजना पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के निधी वितरित करणे आवश्यक आहे़ तेव्हा ग्रामीण योजनांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सदर योजना १०० टक्के पूर्ण झाल्याची खात्री केल्याशिवाय संपूर्ण निधी वितरित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत़
७७६ कामांसाठी वितरित केला निधी
जिल्हा परिषदेमार्फत विविध कामे हाती घेतली होती़ त्यामध्ये नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची १९, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीची १९९, नवीन विंधन विहिरीसाठी १७५, तात्पुरती पुरक नळ योजनेची ४, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ आणि खाजगी विहीर अधिग्रहणाचे ३२३ कामे मागील वर्षी पूर्ण करण्यात आली होती़ जिल्हाधिकाºयांनी नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ८ लाख ५९ हजार ६२९, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी २८ लाख ९१ हजार २९६, नवीन विंधन विहिरींसाठी ९५ लाख ५३ हजार ४२, तात्पुरत्या पुरक नळ योजनेसाठी ११ लाख ५१ हजार ५३३, टँकरसाठी ७९ लाख ५ हजार ५०० रुपये वितरित करण्यात आले आहेत़
लाभार्थ्यांची गैरसोय होणार दूर
मागील वर्षीच्या टंचाई काळत कंत्राटदारांनी कामे केली़ परंतु, त्यांची बिले रखडली होती़ यावर्षी देखील टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, आता कामे करताना कंत्राटदारांसमोर अडचणी उभ्या राहत होत्या़ त्यामुळे थकबाकी अदा करावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात होता़ जिल्हाधिकाºयांनी ही संपूर्ण बिले अदा केल्यामुळे कंत्राटदारांना ही बिले मिळणार आहेत़ त्यामुळे यावर्षी टंचाईच्या काळात नव्याने कामे हाती घेण्यासाठी सोयीचे होणार आहे़