परभणी : हमीभाव केंद्रांना मुदतवाढीची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:13 AM2018-05-16T00:13:06+5:302018-05-16T00:13:06+5:30
जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी शिल्लक असल्याने शासकीय हमीभाव केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी शिल्लक असल्याने शासकीय हमीभाव केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे़
जिल्ह्यातील तूर, हरभरा खरेदीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी १५ मे रोजी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी अधिकारी, कर्मचाºयांची बैठक घेतली़ या बैठकीत संपूर्ण आढावा घेतल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्रांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती राज्य शासनाकडे करण्यात आली़ मुदतवाढ मिळाल्यानंतर उर्वरित संपूर्ण शेतमाल खरेदी करावा, वखार महामंडळाच्या अधिकाºयांनी तूर, हरभरा साठवणुकीसाठी खाजगी गोदामे भाडेतत्त्वावर घ्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या़ यावेळी जिल्हा मार्केटींग अधिकारी एम़डी़ कापुरे, सहायक मार्केटींग अधिकारी शेवाळे, जिल्ह्यातील सहायक निबंधक, बाजार समितीचे सचिव, वखार महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते़
परभणी जिल्ह्यात ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते़ मागील आठवडाभरापासून हमीभाव केंद्र चालकांना तूर साठवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने तुरीची खरेदी संथ गतीने केली जात होती़ शासनाने खाजगी गोदामे घेण्याचे आदेश दिल्यानंतरही साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली आहे़ नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी ४० टक्के शेतकºयांचीच तूर आतापर्यंत खरेदी झाली असल्याने तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़
तूर खरेदी झाली बंद
परभणी जिल्ह्यात सात हमीभाव खरेदी केंद्र नाफेडने सुरू केले होते़ या खरेदी केंद्रावर तूर आणि हरभºयाची हमीभावाने खरेदी करण्यात आली़ दरम्यान तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंतची मुदत असल्याने मंगळवारी दिवसभर तुरीची खरेदी करण्यात आली़ उद्यापासून तूर खरेदी बंद करण्यात आली आहे़ तर हरभºयाची खरेदी २९ मेपर्यंत केली जाणार आहे़