परभणी : निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:19 PM2019-04-22T23:19:22+5:302019-04-22T23:21:06+5:30
तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, नांदापूर, खानापूर, मांडवा, जलालपूर, झरी, कुंभारी, वाडी दमई , हिंगला, सुलतानपूर, पिंपळा, सनपुरी इ. गावांत ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
दुधना नदीपात्र कोरडे पडल्याने पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाली आहे. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीपुरवठा योजना सुरू होऊन या गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार असल्याने निम्न दुधना प्रकल्पातून त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे. या प्रसंगी गंगाप्रसाद आणेराव, नंदू आवचार, राजू परिहार, बालाजी देशमुख, ए.सी.देशपांडे, कुंडलिक पांढरे, आसाराम चव्हाण, चोपडे आदी उपस्थित होते.