परभणी : धर्म हा माणसाचा आत्मसन्मान- शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:05 AM2018-12-31T01:05:24+5:302018-12-31T01:06:38+5:30

धर्म हा माणसाचा आत्मसन्मान आहे, असे सांगून पंचदेवाच्या रुपात धर्म प्रगट होत असतो. जे धर्माने वागतात, त्यांचे जीवन सफल होते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथील शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.

Parbhani: Religion is a man's self-respect - Shankaracharya | परभणी : धर्म हा माणसाचा आत्मसन्मान- शंकराचार्य

परभणी : धर्म हा माणसाचा आत्मसन्मान- शंकराचार्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : धर्म हा माणसाचा आत्मसन्मान आहे, असे सांगून पंचदेवाच्या रुपात धर्म प्रगट होत असतो. जे धर्माने वागतात, त्यांचे जीवन सफल होते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथील शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.
येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात आयोजित धर्मसोहळ्या प्रसंगी रविवारी शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज बोलत होते. ते म्हणाले, धर्म हा सिद्धकोटी आणि साध्यकोटी अशा दोन प्रकारचा असतो. सिद्धकोटी म्हणजे धारण करणे आणि साध्यकोटी म्हणजे साध्य मिळविण्यासाठी तत्व पालन करणे. ईश्वर हा मेकर आणि मॅटर दोन्हीही आहे. कारण तो निर्माण करतो आणि निर्मितही होतो. माणूस मात्र एखादी वस्तू निर्माण करु शकतो. मात्र ती वस्तू सजीव होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी जगद्गुरुंनी पुराण, चरकसंहिता, मत्स्यपुराण, उपनिषदे, अरण्यके, वेद आदींविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांचाही सत्कार करण्यात आला. अ‍ॅड.गणेशराव दुधगावकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ.संध्याताई दुधगावकर, समीर दुधगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सतीश सातोनकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद शास्त्री यांनी आभार मानले.

Web Title: Parbhani: Religion is a man's self-respect - Shankaracharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी