परभणी : अडचणी दूर झाल्याने पूर्णेकरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:14 AM2019-02-18T00:14:55+5:302019-02-18T00:15:08+5:30
शहरातील टंचाई दूर करण्यासाठी सिद्धेश्वर जलाशयातून पाणी घेण्यास निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी रविवारी सायंकाळी दूर झाल्या असून, मंगळवारी पूर्णा बंधाऱ्यात पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): शहरातील टंचाई दूर करण्यासाठी सिद्धेश्वर जलाशयातून पाणी घेण्यास निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी रविवारी सायंकाळी दूर झाल्या असून, मंगळवारी पूर्णा बंधाऱ्यात पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे़
पूर्णा येथील बंधाºयातील पाणीसाठा संपल्याने शहरात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती़ या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर बंधाºयातून १ दलघमी पाण्याची मागणी नगरपालिकेने केली़ त्यास मंजुरीही मिळाली होती़ नियोजनानुसार रविवारी सकाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी सोडले जाणार होते़ परंतु, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पाणी सोडण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली होती़ या पार्श्वभूमीवर खा़ बंडू जाधव यांनी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागातील अधिकाºयांशी संपर्क साधून नियोजनानुसार पाणी सोडण्याचे सूचित केले़ त्यानंतर सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, पाणी सोडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे़
पूर्णा शहरासाठी पालिका प्रशासनाने १ दलघमी पाणीसाठा देण्याची मागणी केली होती़ मात्र या मागणीनुसार पाणी सोडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने रविवारी रात्री किंवा सोमवारी पहाटे जलाशयातून पाणी सोडले जाईल, अशी माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतो संतोष बिराजदार यांनी दिली़
पूर्णा येथील कोल्हापुरी बंधाºयात आलेले पाणी शहराला अडीच ते तीन महिन्यांपर्यंत पुरते़ बंधाºयातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी दुरुस्ती करण्याची गरज आहे़ तेव्हा बंधाºयाची दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी होत आहे़
टंचाई भासू देणार नाही : बशीर
४उन्हाळ्यात पूर्णा शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे़
४नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी पालिकेने योग्य ते नियोजन केले असून, टंचाई निवारण करण्यासाठी उपाययोजनाही राबविल्या जात आहेत़
४त्यामुळे पूर्णा शहरामध्ये पाणीटंचाई भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पाणीपुरवठा सभापती शेख मन्नानबी शेख बशीर यांनी दिली़