परभणी : दोन वर्षांपासून दुरुस्तीची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:49 AM2018-11-29T00:49:45+5:302018-11-29T00:50:15+5:30
परभणी तालुक्यातील झरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून २० गावांना वीजपुरवठा केला जातो; परंतु, या गावांना वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या वीज तारा ठिकठिकाणी लोंबल्या आहेत. विद्युत खांब मोडकळीस आले आहेत. या उपकेंद्रांतर्गत दोन वर्षांपासून वीज दुरुस्तीची कामे करण्यात आली नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
झरी (परभणी ): परभणी तालुक्यातील झरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून २० गावांना वीजपुरवठा केला जातो; परंतु, या गावांना वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या वीज तारा ठिकठिकाणी लोंबल्या आहेत. विद्युत खांब मोडकळीस आले आहेत. या उपकेंद्रांतर्गत दोन वर्षांपासून वीज दुरुस्तीची कामे करण्यात आली नाहीत. त्यामुळे वीज ग्राहकांना या केंद्रातून विस्कळीत वीजपुरवठा होत असल्याने २० गावांतील वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
झरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत साडेगाव, मिर्झापूर, पिंपळा, जलालपूर, खानापूर, डिग्रस, मांडवा, झरी, कुंभारी, बोबडे टाकळी, सावंगी, संबर, वाडी दमई, देवठाणा, जोडपरळी, नांदापूर, पिंगळी कोथाळा, गोकुळवाडी इ. २० गावांना वीजपुरवठा केला जातो.
या गावांचा कारभार पाहण्यासाठी सहा लाईनमन, चार आॅपरेटर व तीन कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. या उपकेंद्रांतर्गत ३ हजार विद्युत ग्राहक आहेत. अडीच हजार कृषीपंप व १०० ते ११० विजेची साधने व पाणीपुरवठा करणाºया योजनांना वीजपुरवठा केला जातो. मात्र २० गावांना वीजपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली वीज वाहिनी जुुनी असल्याने मोडकळीस आली आहे. त्यामुळे या वीज वाहिनीतून वीज पुरवठा करताना वारंवार खंडित होत आहे. याचा फटका वीज ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे या केंद्रांतर्गत असलेली जुनी वीज वाहिनी बदलावी, अशी मागणी २० गावांतील ग्रामस्थांनी वारंवार महावितरण व उपकेंद्राच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे केली आहे; परंतु, अद्यापपर्यंत यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर वीज दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो; परंतु, प्रत्यक्षात वीज दुरुस्तीची कामे केली जात नाहीत.
झरी उपकेंद्रांतर्गत दोन वर्षांपासून वीज दुरुस्तीची कामे केली जात नसल्याने वीज ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बहुतांश शेतकºयांनी रबी हंगामातील पेरणी केली नाही; परंतु, ज्या शेतकºयांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे, त्या शेतकºयांनी ज्वारी, गहू, हरभºयाची पेरणी केली आहे. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने कृृषीपंपधारक वैतागले आहेत.
या उपकेंद्राच्या कनिष्ठ अभियंत्यांनी याकडे लक्ष देऊन जुन्या झालेल्या वीज तारा बदलाव्यात, वीज उपकेंद्रांत दुरुस्तीची कामे करावित आणि ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
विद्युत रोहित्राचे कीटकॅट बॉक्स उघड्यावर
परभणी तालुक्यातील झरी उपकेंद्रांतर्गत जवळपास २०० ते ३०० च्या वर विद्युत रोहित्र आहेत; परंतु, एकाही विद्युत रोहित्राचे कीटकॅट बॉक्स सुस्थितीत नाहीत. अनेक बॉक्सच्या तारा उघड्यावर असल्याने विद्युत रोहित्र परिसरातून वावरणाºया नागरिक व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परभणी येथील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन प्रत्येक विद्युत रोहित्राला नवीन कीटकॅट बॉक्स बसवावेत, अशी
१२ तास केले जाते भारनियमन
झरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत २० गावातील वीज ग्राहकांना २४ तासांपैकी केवळ १२ तासच वीजपुरवठा केला जातो. त्यातही हा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. एकीकडे राज्य शासन व उर्जा विभाग वीज ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रयत्न करीत असताना या उपकेंद्रांतर्गत मात्र बारा बारा तास भारनियमन केले जात आहे. त्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले असून भारनियमनाचा कालावधी कमी करावा, अशी मागणी होत आहे.मागणी वीज ग्राहकांतून होत आहे.