परभणी : ‘प्रासंगिक करारा’मुळे प्रवाशांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:06 AM2018-05-08T00:06:29+5:302018-05-08T00:06:29+5:30
एस.टी.महामंडळाच्या परभणी आगारातून अनेक बसेस प्रासंगिक करारासाठी दिल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नियमित फेऱ्या रद्द करुन बसेस दिल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एस.टी.महामंडळाच्या परभणी आगारातून अनेक बसेस प्रासंगिक करारासाठी दिल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नियमित फेऱ्या रद्द करुन बसेस दिल्या जात आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईमुळे प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. सकाळी ६ वाजेपासून बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत असून सायंकाळी उशिरापर्यंत ही गर्दी कायम असते. याच काळात लग्नतिथींची संख्या अधिक असल्याने या लग्न सोहळ्यासाठी एस.टी.महामंडळाच्या बसगाड्या प्रासंगीक करारावर नेल्या जात आहेत. रविवारी मोठी लग्नतिथी होती. परभणी आगारात नव्यानेच १२ शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. त्यातील ६ शिवशाही बसगाड्या रविवारी प्रासंगीक करारासाठी देण्यात आल्या. त्यामुळे नियमित प्रवास करणाºया प्रवाशांची मात्र गैरसोय झाली.