परभणी : कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:45 AM2018-08-09T00:45:55+5:302018-08-09T00:46:35+5:30
केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी ७ आॅगस्टपासून संपावर गेले असून, दुसºया दिवशीही संपाला प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प राहिले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरकारीकर्मचारी ७ आॅगस्टपासून संपावर गेले असून, दुसºया दिवशीही संपाला प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प राहिले़
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभरातील इतर शासकीय कार्यालयांमधील सरकारी कर्मचाºयांनी बुधवारी संपात सहभाग नोंदविला़ जलसंपदा विभाग व पाटबंधारे विभागातील कर्मचारीही शुक्रवारच्या संपात सहभागी झाले होते़ कर्मचाºयांनी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करून आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या़ यावेळी मंगेश जोशी, प्रशांत सिरस, नानासाहेब भेंडेकर, प्रवीण भानेगावकर, अशोक जाधव, आशा देशपांडे आदी पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले़ कर्मचाºयांच्या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुकशुकाट पहावयास मिळाला़
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचाºयांनी बुधवारी कामकाज केले़ मंगळवारी केवळ एक दिवसाचा संप या कर्मचाºयांनी केला होता तसेच अत्यावश्यक बाब म्हणून जिल्ह्यातील परिचारिकांचा संपाला पाठींबा घेऊन या परिचारिका कामकाजावर रुजू झाल्या़ त्यामुळे शासकीय रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सेवा दिवसभर सुरळीत होती़
पालिका, मनपाचे कामकाज सुरळीत
राज्य सरकारी कर्मचाºयांनी संप पुकारला असला तरी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाºयांनी या संपात सहभाग नोंदविला नाही़ त्यामुळे दोन्ही दिवस कामकाजावर कुठलाही परिणाम झाला नाही़
संपावरील कर्मचारी
गुुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण ४४१ कर्मचारी अनुस्थित होते़ तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांतील १२४१ कर्मचारी संपात सहभागी असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली़