परभणी : ‘तुफानातील दिवे’ संगीतमय कार्यक्रमास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:15 AM2019-04-15T00:15:50+5:302019-04-15T00:17:30+5:30
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० ते १२ एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या ‘तुफानातील दिवे’ या संगीतमय कार्यक्रमास मानवतकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० ते १२ एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या ‘तुफानातील दिवे’ या संगीतमय कार्यक्रमास मानवतकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष सत्यशील धबडगे हे होते. व्यासपीठावर गणेश कुमावत, ज्ञानेश्वर मोरे, दत्ता चौधरी, सय्यद जमील, राजू खरात, अनंत भदर्गे, सचिन कोकर, अमृतराव भदर्गे यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सजीव देखाव्यासह गीत सादर करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकण्यात आली. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन विजय वाकोडे यांच्या हस्ते झाले. शहरातील प्रमुख रस्त्याने मार्गक्रम झालेल्या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळा जागेजवळ समारोप करण्यात आला. सायंकाळी ‘महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देश उभारणीत योगदान’ या विषयावर व्याख्यान झाले. १२ रोजी ‘भीम विचारांचा प्रवाह’ या संगीतमय कार्यक्रमाचे उद्घाटन शिवनारायण सारडा यांच्या हस्ते झाले. यावेळी विजयकुमार दलाल, बाबूराव हलनोर, बालाजी दहे, शंकर हरबडे, अमृत भदर्गे, अनंत भदर्गे, विनोद राहटे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीते सादर केली. अमोल मगर यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी समिती पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
ल्लसंत सावता मित्र मंडळ वालूर
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव चौरे हे होते. यावेळी संत सावता मित्र मंडळाच्या वतीने ११ एप्रिल रोजी गावातील संत सावता नगरात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता फुलांनी सजविलेल्या रथामधून क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ल्लक्रांतीसूर्य प्रतिष्ठान, धनेगाव
सेलू तालुक्यातील धनेगाव येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. अशोक उफाडे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून कवि केशव खटींग, दिगंबर रोकडे, शरद ठाकर, पवन कटारे यांची उपस्थिती होती. यावेळी खटीेंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाम कटारे यांनी प्रास्ताविक केले. संतोष कटारे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल कटारे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
जिंतूर शहरातून मिरवणूक
४जिंतूर- क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त समता परिषद व माळी समाजाच्या वतीने जिंतूर शहरातून ११ एप्रिल रोजी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन प्रमोद भांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सत्यनारायण शर्मा, कपील फारोखी, बाळासाहेब भांबळे, विश्वनाथ राठोड, नानासाहेब राऊत, रामराव उबाळे, रामेश्वर जावळे, मनोहर डोईफोडे, शाहेदबेग मिर्झा, दलमीर खान पठाण, मीनाताई राऊत, अर्चनाताई काळे, अहेमद बागवान, बाळासाहेब काजळे, इर्शाद पिंपरीकर, राजेभाऊ नगरकर, अंगद सोगे यांची उपस्थिती होती. या मिरवणुकीला शहरातील महात्मा फुले चौकापासून प्रारंभ झाला. तेथून शिवाजी चौक, येलदरी रोड, नृसिंह चौक, दादा शरीफ चौक, मेन चौक, पोलीस स्टेशनसमोरुन घोषणा देत संत सावतामंदिर परिसरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यशस्वीतेसाठी दत्ता काळे, गंगाधर गोरे, महादू काळे, गुलाब नाहतकर, दत्ता कटारे, मारोती काळे, सुभाष कटारे, सचिन साळवे, विठ्ठल होले, प्रकाश काळे, राहुल राऊत, प्रकाश लांडगे, कृष्णा इखे, जे.डी.कापुरे, गणेश काळे आदींनी प्रयत्न केले.