परभणी : नळ जोडणी साहित्याची जबाबदारी नागरिकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:19 AM2020-02-18T00:19:14+5:302020-02-18T00:20:06+5:30

शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी प्रक्रियेबाबत महानगरपालिकेने लवचिक भूमिका घेतली असून, आता नागरिकांकडून २ हजार रुपये अनामत रक्कम, नळ जोडणी देण्यास २०० रुपये व रस्ता दुरुस्तीचे १५०० रुपये एवढीच रक्कम महानगरपालिका घेणार असून, यासाठी लागणारे साहित्य आणण्याची व त्यासाठीच्या खोदकामाची जबाबदारी नळ जोडणी धारकांवरच टाकण्यात आली आहे़ या प्रक्रियेतून कंत्राटदाराला बाजुलाच करण्यात आल्याची माहिती आ़ सुरेश वरपूडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़

Parbhani: The responsibility of the plumbing material for the citizens | परभणी : नळ जोडणी साहित्याची जबाबदारी नागरिकांवर

परभणी : नळ जोडणी साहित्याची जबाबदारी नागरिकांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी प्रक्रियेबाबत महानगरपालिकेने लवचिक भूमिका घेतली असून, आता नागरिकांकडून २ हजार रुपये अनामत रक्कम, नळ जोडणी देण्यास २०० रुपये व रस्ता दुरुस्तीचे १५०० रुपये एवढीच रक्कम महानगरपालिका घेणार असून, यासाठी लागणारे साहित्य आणण्याची व त्यासाठीच्या खोदकामाची जबाबदारी नळ जोडणी धारकांवरच टाकण्यात आली आहे़ या प्रक्रियेतून कंत्राटदाराला बाजुलाच करण्यात आल्याची माहिती आ़ सुरेश वरपूडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़
शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी दरासंदर्भात सोमवारी बी़ रघुनाथ सभागृहात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ़ सुरेश वरपूडकर यांनी पत्रकार परिषद घेतली़ यावेळी वरपूडकर म्हणाले की, या योजनेचे अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केले होते़ मनपा सर्वसाधारण सभेने केवळ दर करारास मंजुरी दिली होती़ नागरिकांवर अधिक बोजा येऊ नये, म्हणून या संदर्भात काही निर्णय घेण्यात आले होते; परंतु, नागरिकांची वाढती मागणी व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे या योजनेच्या अंमलबजावणीत बदल केला आहे़ आता मनपा प्रत्येक नागरिकाकडून २ हजार रुपये अनामत, २०० रुपये नळ जोडणी देण्याचे शुल्क आणि कच्चा रस्ता दुरुस्तीसाठी १२०० रुपये तर पक्का रस्ता दुरुस्तीसाठी १५०० रुपये शुल्क प्रति नळ कनेक्शन आकारेल़ ज्या नळ धारकांना रस्ता न फोडता नळ जोडणी देता येईल, त्यांच्याकडून हे शुल्क घेतले जाणार नाही़ तसेच नागरिकांनी आयएसआय ट्रेडमार्क १० कंपन्यांपैकी एका कंपनीचे पाईप, मीटर आदी साहित्य खरेदी करायचे आहे़ मिटर बॉक्स बसवायचा की नाही? हे नळजोडणी धारकांनीच ठरवायचे आहे़ मिटर बंद पडल्यास किंवा त्यात बिघाड आढळून आल्यास त्याला नळ जोडणीधारकास जबाबदार धरले जाईल व त्यानुसार त्यांना मनपाकडे दंड भरावा लागेल़ मनपा प्रत्येक प्रभाग समितीत १० असे एकूण शहरात ३० नोंदणीकृत प्लंबर नियुक्त करेल़ त्यांना प्रशिक्षण देईल़ त्यांच्यामार्फतच प्रत्येकाला नळ जोडणी मनपा देईल़ नोंदणीकृत प्लंबर व्यतिरिक्त कोणी नळ जोडणी घेतल्यास ती अनाधिकृत समजून संबंधितांवर कारवाई केली जाईल. उन्हाळ्यापर्यंत शहरातील सर्व नागरिकांना पाणी देण्याचे मनपाचे नियोजन असल्याचे ते म्हणाले़ या पत्रकार परिषदेस उपमहापौर भगवान वाघमारे, गटनेते माजू लाला, रविंद्र सोनकांबळे, नगरसेवक सुनील देशमुख, इम्रान लाला, विरोधी पक्षनेते विजय जामकर, सभापती नागेश सोनपसारे, विनोद कदम, अमोल जाधव आदींची उपस्थिती होती़
‘सर्वसाधारण सभेतच केले होते अ, ब, क चे वर्गीकरण’
४आ़ वरपूडकर म्हणाले, या नळ योजने संदर्भात गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रात येणाऱ्या काही बातम्यांमध्ये चुका आहेत़ २७ जानेवारी रोजी मनपाने घेतलेल्या सर्वसाधारण सभेच्या ठरावातच नागरिकांना नळ जोडणी संदर्भात अ, ब,क असे तीन वर्गीकरण केले होते़ अ मध्ये नवीन नळ जोडणीकरीता सरसकट ४ ऐवजी २ हजार रुपये अनामत, ब मध्ये प्रति नळ जोडणीस १० ऐवजी ९ हजारांचे अंदाजपत्रक, त्यात सर्व साहित्य समाविष्ट आणि क मध्ये नळ जोडणी धारकास १५ मिटरपेक्षा जास्तीचा पाईप लागेल त्याला १८० रुपये प्रति मिटर व एल्बोचे जे दर असतील. १५ मिटरपेक्षा कमी अंतराचा पाईप लागल्यास जो पाईप वाचेल त्यास १८० रुपये प्रति मिटरप्रमाणे एजन्सीधारकाने नळ जोडणी धारकाच्या ९ हजारांतून कमी करावेत, तसेच प्रति नळ जोडणीचा स्थळ दर्शक नकाशा व जिओ टॅग नोट कॅम या अ‍ॅपद्वारे घेणे एजन्सीला बंधनकारक करण्यात आले होते़ आता नळ जोडणी दिल्यानंतर याबाबतचे फोटो जीपीएस किंवा नोटकॅमद्वारे नळ जोडणी देणाºया प्लंबरने अपलोड करायचे आहेत. ती त्यांच्यावर जबाबदार आहे, असे वरपूडकर म्हणाले़
अनाधिकृत नळ जोडणीच्या कारवाईची प्रशासनाची जबाबदारी
अनाधिकृत नळ जोडणी संदर्भात कडक भूमिका घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिले आहेत़ त्यामुळे यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हस्तक्षेप करणार नाही.अनाधिकृत नळ जोडणी आढळल्यास या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई प्रशासनाची आहे व त्यासाठी त्यांना मोकळीक आहे़ ज्यांनी अनाधिकृत नळ जोडण्या घेतल्या आहेत़ त्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत नियमित करून घ्याव्यात, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा त्यांनी दिला.
विभागीय आयुक्तांचे सहकार्य
विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी या नळ योजनेस मोठे सहकार्य केले आहे़ त्यांनी परभणी शहरासाठी ४४० कोटींची भूमीगत गटार योजना व शहरासाठी नव्या ११७ कोटींच्या अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी पुढाकार घेतला आहे़ राहटीची पाणी पुरवठा योजना कायम ठेवली जाणार असून, येथील राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पूलकम बंधारा उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ शहराच्या बायपाससाठी ६७ कोटी रुपये मंजूर करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला व सदरील निधी मंजूर झाला, असे वरपूडकर म्हणाले़

Web Title: Parbhani: The responsibility of the plumbing material for the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.