परभणी : दुसऱ्याच दिवशी पावसाने घेतली विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:47 PM2019-06-23T23:47:58+5:302019-06-23T23:48:15+5:30
शनिवारी पहाटे मान्सूनच्या पावसाने आगमन झाल्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आकाशाकडे लागले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शनिवारी पहाटे मान्सूनच्या पावसाने आगमन झाल्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आकाशाकडे लागले आहेत़
जिल्ह्यात १५ ते २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतेत होते़ मान्सूनचा पाऊस जास्त होत नसल्याने पेरण्या कराव्यात की नाही? अशी द्विधा मन:स्थिती झाली होती़ पेरण्यांसाठी यावर्षी मे महिन्यापासून शेतकºयांनी तयारी करून ठेवली़ शेत जमिनी नांगरून आणि पाळ्या घालून पेरणीसाठी सज्ज केल्या होत्या़ पाऊस झाल्यानंतर थेट पेरण्यांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती़ त्यासाठी मान्सूनच्या मोठ्या पावसाची शेतकºयांना प्रतीक्षा लागली़ अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शनिवारी पहाटे जिल्हाभरात मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला़ या पावसाळ्यातील पहिल्याच पावसाने वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे़ शेतकºयांनीही पेरण्यांसाठी लगबग सुरू केली़ शनिवारी दिवसभर मोंढा बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती़ रविवारी देखील पाऊस होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती़ मात्र पावसाने चक्क विश्रांती घेतली़ सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले़ मात्र कोठेही पाऊस बरसला नाही़ त्यामुळे पुन्हा एकदा पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना लागली आहे़
दरम्यान, शनिवारी रात्री जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे़ सरासरी २़४२ मिमी पाऊस झाला आहे़ पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ७़२० मिमी पावसाची नोंद झाली असून, परभणी १़५०, पालम ३ मिमी, गंगाखेड १़२५ मिमी, सोनपेठ २ मिमी, पाथरी १ मिमी, जिंतूर २़८३ मिमी आणि मानवत तालुक्यात ३ मिमी पाऊस झाला़ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिमी असून, आतापर्यंत जिल्ह्यात ३४़३३ मिमी पाऊस झाला आहे़