परभणी : परतीच्या पावसाचा पिकांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:42 AM2019-10-22T00:42:27+5:302019-10-22T00:44:05+5:30

शनिवार व रविवारी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे़ यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़

Parbhani: The return rains hit the crops | परभणी : परतीच्या पावसाचा पिकांना बसला फटका

परभणी : परतीच्या पावसाचा पिकांना बसला फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शनिवार व रविवारी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे़ यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़
यावर्षीच्या खरीप हंगामात जून ते आॅक्टोबर महिन्यापर्यंत कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी हजारो रुपयांचा खर्च करून कापूस, सोयाबीन ही पिके जोपासली़ विशेष म्हणजे या संपूर्ण पावसाळ्यामध्ये पिकासाठी पोषक पाऊस झाल्याने पिकेही चांगली बहरली आहेत़ त्यामुळे मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती बदलून यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती़ बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनची कापणी करून शेतामध्ये साठवण केली आहे; परंतु, शनिवार व रविवारी झालेल्या पावसाने या पिकाला मोठा फटका बसला असून, हे सोयाबीन काळे पडत आहे़ त्यातच कापूस पिकाला सध्या बोंडे लागत आहेत़ मात्र दोन दिवस झालेल्या पावसाने कापसाच्या शेतामध्ये पाणी साचले आहे़
यामुळे पिकांची बोंडे गळत असून, पीक सुकत आहे़ हजारो रुपये खर्च करून जोपासलेल्या कापूस व सोयाबीन पिकांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ हाता-तोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिरावून नेतो की काय, अशी चिंता जिल्ह्यातील शेतकºयांना सतावू लागली आहे़ या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: The return rains hit the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.