परभणी : मुद्रांक विक्रीतून ४ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:53 AM2019-01-10T00:53:48+5:302019-01-10T00:54:22+5:30

जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी घ्याव्या लागणाऱ्या मुद्रांकातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत एका महिन्यामध्ये ४ कोटी २१ लाख ५ हजार ३९० रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारावरही त्याचा परिणाम झाला असेल, अशी शक्यता होती़ परंतु, डिसेंबर महिन्यातील मुद्रांक विक्रीच्या आकड्यातून हे व्यवहार वाढले असल्याचे समोर येत आहे़

Parbhani: Revenue of 4 crores from stamp sale | परभणी : मुद्रांक विक्रीतून ४ कोटींचा महसूल

परभणी : मुद्रांक विक्रीतून ४ कोटींचा महसूल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी घ्याव्या लागणाऱ्या मुद्रांकातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत एका महिन्यामध्ये ४ कोटी २१ लाख ५ हजार ३९० रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारावरही त्याचा परिणाम झाला असेल, अशी शक्यता होती़ परंतु, डिसेंबर महिन्यातील मुद्रांक विक्रीच्या आकड्यातून हे व्यवहार वाढले असल्याचे समोर येत आहे़
शेत जमीन, प्लॉट, घरांची खरेदी-विक्री करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातून व्यवहार करावे लागतात़ खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जमिनीच्या प्रत्यक्ष शासकीय दरानुसार दस्त खरेदी केले जातात़ त्यावरून जमिनीचा फेरफार आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात़ जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ परतीचा पाऊस नसल्याने रबीच्या हंगामावर पाणी फेरले गेले़ त्यामुळे संपूर्ण कृषी व्यवसाय आर्थिक कचाट्यात सापडला आहे़ जिल्ह्यात कृषी व्यवसायावरच इतर सर्व बाजारपेठांची दारोमदार अवलंबून आहे़ दुष्काळाचा परिणाम सर्वच बाजारपेठांवर झाला आहे़ नवा मोंढा भागातील कृषी निविष्ठांची बाजारपेठ असो किंवा कापड बाजार, सराफा बाजार आणि भुसार बाजारात सध्या मंदीची लाट आहे़ ग्राहक नसल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत़ त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या अनुषंगाने दुष्काळाच्या झालेल्या परिणामाची माहिती घेतली तेव्हा हे व्यवहार कमी झाले नसून ते वाढले असल्याचे समोर आले आहे़ जिल्ह्यामध्ये परभणी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयामधून खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात़ मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यात २ हजार ३६५ दस्तांची विक्री झाली होती़ त्यातून जिल्हा मुद्रांक अधिकारी कार्यालयाला २ कोटी ९४ लाख १५ हजार ९९५ रुपयांचा महसूल मिळाला़ तर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात २ हजार ३९७ दस्तांची विक्री झाली आहे़ यातून ४ कोटी २१ लाख ५ हजार ३९० रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे़ विशेष म्हणजे २०१७ आणि २०१८ या दोन वर्षातील डिसेंबर महिन्यातील दस्त विक्रीचा आढावा घेतला असता २०१८ च्या डिसेंबर महिन्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही ३२ दस्तांची विक्री वाढली आहे़ नोव्हेंबर महिन्यात मात्र दस्तांच्या विक्रीत थोडासा परिणाम झाला आहे़ नोव्हेंबर २०१७ मध्ये १ हजार ८३६ दस्तांची विक्री झाली़ त्यातून २ कोटी ९४ लाख ६८ हजार ३५० रुपयांचा महसूल मिळाला़ तर नोव्हेंबर २०१८ मध्ये १ हजार ७१३ दस्तांची विक्री झाली असून, त्यातून २ कोटी ९३ लाख ३८ हजार ७२० रुपयांचा महसूल प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे़
या महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत फारसा फरक झाला नसला तरी दस्तांची विक्री घटली आहे़ दुष्काळी परिस्थितीमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार घटणे अपेक्षित होते़ परंतु, तुलनात्मक दृष्टीकोणातून घेतलेल्या आकड्यांवरून खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले असल्याचेच स्पष्ट होत आहे़ दुष्काळी परिस्थितीतही जमीन, प्लॉट खरेदी-विक्रीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे़
पैशांच्या चणचणीतून : खरेदी-विक्री
४ग्रामीण भागामध्ये दुष्काळ अधिक तीव्र आहे़ उत्पन्नासाठी दुसरे कुठलेही साधन शेतकºयांकडे उपलब्ध नाही़ दैनंदिन गरजा तर भागविणे आवश्यक आहे़ अशा परिस्थितीत पैसा उपलब्ध करायचा कसा? असा शेतकºयांसमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे़ बँकांमधून तातडीचे कर्ज मिळत नाही़ खाजगी कर्ज घेताना गहाणखत करावे लागते़ त्यामुळे घरातील जमिनीचा तुकडा विकून तात्पुरती व्यवस्था करण्यावर शेतकरी, सर्वसामान्य नागरिक भर देतात़ त्वरित पैसा उपलब्ध होत असल्याने मिळेल ते दर घेवून शेतातील काही भाग, राखून ठेवलेले प्लॉट विक्री केले जात असावेत आणि त्यातूनच जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये वाढ झाली असावी, अशी एक शक्यताही वर्तविली जात आहे़
मूल्यांकनाचे दर वाढल्याने महसूलात वाढ
४२०१७ मध्ये जमिनीच्या मूल्यांकनाचे दर कमी होते़ २०१८ मध्ये या दरात वाढ झाल्यामुळे महसूलामध्ये वाढ झाली आहे़ परंतु, मुद्रांक विक्रीतही तेवढीच वाढ झाली आहे़ त्यामुळे प्रत्यक्ष मुद्रांक विक्रीवरून खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढत असल्याचेच दिसत आहे़ जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून प्रत्यक्षात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्यास सुरुवात झाली़ त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील खरेदी-विक्रीवर परिणाम होईल, असे वाटत होते़ परंतु, परिस्थिती मात्र त्या उलट असल्याचेच दिसत आहे़
हिंगोली जिल्ह्यातही वाढला महसूल
परभणी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत हिंगोली जिल्ह्याचाही कारभार पाहिला जातो़ या जिल्ह्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये १ हजार २३९ दस्तांची विक्री झाली़ त्यातून १ कोटी ७५ लाख ४० हजार २७० रुपयांचा महसूल जिल्ह्याला मिळाला़ नोव्हेंबर २०१८ मध्ये दस्त विक्री कमी झाली आहे़ १ हजार १०२ मुद्रांक दस्त विक्रीतून १ कोटी ५८ लाख ९२ हजार ६५ रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला़ तर डिसेंबर २०१७ मध्ये १ हजार ५३५ दस्तांची विक्री झाली़ त्यातून १ कोटी ९५ लाख ७८ हजार ३६० रुपयांचा महसूल जमा झाला असून, डिसेंबर २०१८ मध्ये १ हजार ४१२ दस्तांच्या विक्रीतून २ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल प्रशासनाला उपलब्ध झाला आहे़

Web Title: Parbhani: Revenue of 4 crores from stamp sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.