परभणी : अवैध वाळू चोरी प्रकरणी महसूल कर्मचारी गोत्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:27 PM2018-03-12T23:27:01+5:302018-03-12T23:27:13+5:30
तालुक्यातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १ हजार ५७४ ब्रास वाळू चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात चार गावांतील पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत आले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. पाथरी तालुक्यामध्ये गतवर्षी जुलै महिन्यात २२ ठिकाणचे वाळू साठे महसूल प्रशासनाने जप्त केले होते. यामध्ये तब्बल ४ हजार ५०० ब्रास वाळू साठा आढळून आला होता. वाळू साठे जप्त करून त्या त्या गावच्या पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : तालुक्यातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १ हजार ५७४ ब्रास वाळू चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात चार गावांतील पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत आले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
पाथरी तालुक्यामध्ये गतवर्षी जुलै महिन्यात २२ ठिकाणचे वाळू साठे महसूल प्रशासनाने जप्त केले होते. यामध्ये तब्बल ४ हजार ५०० ब्रास वाळू साठा आढळून आला होता. वाळू साठे जप्त करून त्या त्या गावच्या पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले होते.
जप्तीची कारवाई झाल्यानंतर वाळू साठ्याचे लिलाव होण्यापूर्वीच जप्त साठ्यातील वाळूला पाय फुटल्याचे दिसून आले. या साठ्यातील वाळू चोरी होत असल्याचा प्रकार निदर्शनास येताच महसूल विभागाने जानेवारी २०१८ मध्ये वाळू साठ्याची तपासणी केली. याचा अहवाल पाथरी येथील उपजिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आला. त्यानंतर २२ साठ्यांपैकी ९ वाळू साठा चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली. तालुक्यातील लोणी सज्जाचे तलाठी एस.एन.शिंदे, हादगावचे मंडळ अधिकारी गोवंदे, लोणीचे पोलीस पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याच बरोबर हादगाव बु., वरखेडा, डाकू पिंपरी आणि तारूगव्हाण येथील पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी यांनाही नोटिसा देण्यात आल्या.
या साठ्यातून शासनाचा २८ लाखांचा महसूल बुडाला आहे. तसेच वाळू साठे करणाºया शेतमालकांवरही गुन्हे दाखल झाले असून त्यांच्या सातबारावरही बोजा पडणार आहे.
उपजिल्हाधिकाºयांनी बजावली फेरनोटीस
वाळू साठे जप्त झाल्यानंतर वेळेच्या आत या वाळू साठ्याचा लिलाव होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. रात्री-बेरात्री वाळू तस्करांंनी वाळुची चोरी केली. वाळू साठे चोरी गेल्याचे सुरुवातीला फारसे गांभीर्य वाटले नाही. मात्र या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंंतर यंत्रणा कामाला लागली. वाळू चोरी प्रकरणात यापुर्वी ८ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच महसूल कर्मचाºयांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.
या संदर्भात पोलीस पाटील, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर काय कारवाई केली? याची फेरनोटीस उपजिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांना दिले आहेत.
बंधाºयासाठी वाळू वापरली
तारूगव्हाण येथील बंधारा कार्यक्षेत्रामध्ये २ हजार ५०० ब्रास जप्त वाळू साठा शिल्लक होता. यातील १६ लाख रुपये किंमतीची ९०० ब्रास वाळू बंधाºयाचे ठेकेदार पियूष कंस्ट्रक्शनचे मालक अरविंद रेड्डी यांनी प्रशासनाच्या परस्पर बंधारा कामासाठी वापरली. त्यानंतर ९०० ब्रास वाळू चोरी प्रकरणी ठेकेदार अरविंद रेड्डी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
पाथरी तालुक्यातील जप्त वाळू साठे चोरी प्रकरणी जबाबदार कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत दोन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
-सी.एस.कोकणी, उपजिल्हाधिकारी, पाथरी