परभणी : महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:11 PM2019-05-04T23:11:06+5:302019-05-04T23:11:33+5:30

तालुक्यातील कुंडी सज्जाचे तलाठी सचिन नवगिरे यांना गुरुवारी वाळूमाफियांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवित शनिवारी लेखणीबंद आंदोलन केले.

Parbhani: The revenue workers movement of revenue workers | परभणी : महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

परभणी : महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): तालुक्यातील कुंडी सज्जाचे तलाठी सचिन नवगिरे यांना गुरुवारी वाळूमाफियांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवित शनिवारी लेखणीबंद आंदोलन केले.
कुंडी येथील तलाठी सचिन नवगिरे यांनी गुरुवारी कसुरा नदीतून अवैधपणे वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनधास्तपणे वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर थांबवून विचारणा केली. तेव्हा पाच वाळूमाफियांनी तलाठी नवगिरे यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सेलू पोलिसात गुरुवारी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापही या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महसूल विभागातील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी शनिवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली. या आंदोलनात तहसीलदार बालाजी शेवाळे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद आष्टीकर, अमर जोरगेवाड, माधव कुरेवाड, योगेंद्र नांदापूरकर, बाबासाहेब बन, किरण देशमुख, रुपेश वाव्हळे, विकास आगलावे, राम साखरे, मनोहर चिंचणे, अनंत शहाणे, प्रणव मानवते, अशोक भवर, ना.ता. बहुरे यांच्यासह कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होेते.

Web Title: Parbhani: The revenue workers movement of revenue workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.