परभणी : अन्न सुरक्षा कायद्यासाठी रिपाइंचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:38 AM2019-08-08T00:38:10+5:302019-08-08T00:38:52+5:30

राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू असतानाही परभणी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी हक्काच्या रेशनपासून वंचित राहत आहेत़ या पार्श्वभूमीवर शासनाकडे जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़

Parbhani: Ripai's agitation for food security law | परभणी : अन्न सुरक्षा कायद्यासाठी रिपाइंचे आंदोलन

परभणी : अन्न सुरक्षा कायद्यासाठी रिपाइंचे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू असतानाही परभणी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी हक्काच्या रेशनपासून वंचित राहत आहेत़ या पार्श्वभूमीवर शासनाकडे जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत रिपाइंचे अनेक कार्यकर्ते, लाभार्थी सकाळी १० वाजेपासून एकत्र झाले़ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही लक्ष दिले जात नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
त्यात आॅनलाईन ट्रान्झेक्शन प्रमाणे डी-१ मधील कुटूंब संख्या वाढल्याने वाढीव कोटा द्यावा, परभणी शहरातील एक रेशन दुकानदार आॅनलाईन रेशन वाटप करीत नाही़ त्याची चौकशी करावी, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये आहे़ त्यांना पीएचएच योजनेचा लाभ द्यावा, जुने कार्ड बदलून विभक्त कुटूंबाला नवीन कार्ड वितरित करावे आदी मागण्या करण्यात आल्या़ रिपाइंचे राज्य सचिव लक्ष्मणराव बनसोडे, राज्य संघटक डी़एऩ दाभाडे, शबानाबी अहमद शेरू, शेख हिदायत शेख बाबामियाँ, अमीनाबी शेख बेगम, आशाबी बाशिद खान, मोहम्मद रफिक शेख मोसीद, रानूबाई वायवळ, भगवान कांबळे, मनोहर सावंत, युनूस खान आदींसह लाभधारक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते़

Web Title: Parbhani: Ripai's agitation for food security law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.