परभणी : उपचारांवर झाला २९ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:05 AM2019-07-15T00:05:18+5:302019-07-15T00:05:39+5:30
राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील १३ हजार ३२ रुग्णांनी वर्षभरात उपचार घेतले असून, त्यांच्या उपचारावर २९ कोटी ६१ लाख ४० हजार ६० रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील १३ हजार ३२ रुग्णांनी वर्षभरात उपचार घेतले असून, त्यांच्या उपचारावर २९ कोटी ६१ लाख ४० हजार ६० रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली़
समाजातील गोरगरीब रुग्ण आर्थिक समस्येअभावी वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने राज्यात महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते़ २१ नोव्हेंबर २०१३ रोजी या योजनेला प्रारंभ झाला़ पूर्वी ही योजना राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने कार्यारत होती़ १३ एप्रिल २०१७ मध्ये शासनाने महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना या नावाने ही योजना सुरू केली आहे़ या योजनेंतर्गत विविध ९७१ आजारांचा समावेश असून, या आजारांवर प्रत्येकाला उपचार मिळावा या उद्देशाने योजना कार्यान्वित करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती केली़
या योजनेंतर्गत रेशन कार्ड असणाऱ्या व्यक्तींना योजनेचा लाभ दिला जातो़ त्यात प्रतिवर्षी प्रति कुटूंब दीड लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते तर मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणासाठीही अडीच लाख रुपयांचा लाभ दिला जातो़ विशेष म्हणजे या योजनेंतर्गत कुटूंबातील एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना लाभ घेता येतो़ या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयामध्ये त्या रुग्णाच्या आजारावर नि:शुल्क उपचार केले जातात़ पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी, आवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका असणाºया लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो़
परभणी जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१८ पासून ते ३० जूनपर्यंत १३ हजार ३२ रुग्णांनी विविध आजारांवर उपचार घेतले आहेत़ या रुग्णांच्या उपचारावर २९ कोटी ६१ लाख ४० हजार ६० रुपयांचा खर्च झाला आहे़ तर ही योजना सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत ४१ हजार ३६३ रुग्णांना योजनेचा लाभ झाला असून, त्यावर ९८ कोटी ४२ लाख २ हजार ८१८ रुपयांचा खर्च झाला आहे़ विशेष म्हणजे, परभणी जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा असून, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील उपचारांची माहितीही प्रशासनाने ठेवली आहे़
१० आॅक्टोबर २०१५ पासून आजपर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ३०२ शेतकºयांनी शेतकरी रेशनकार्डावर योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयालयाने दिली़
या आजारांवर होतो उपचार
च्या योजनेंतर्गत ९७१ उपचार, शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे़ त्यामध्ये सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्यांच्या शस्त्रक्रिया व उपचाऱ
च्बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांच्या आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णांवरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मीक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मीक उपचार, एंडोक्राईन व इंटरव्हेशनल रेडिओलॉजी उपचारांचा लाभ मिळतो़
च्या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते़ वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णालयातील उपचार, निदानासाठी लागणाºया चाचण्या, आवश्यक औषधोपचार, सुश्रूषा व भोजन आणि परतीचा प्रवासाचा खर्च यांचा समावेश आहे़ त्याच प्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यावर पाठपुरावा सेवा दिली जाते़
च्तसेच १० दिवसांपर्यंत गुंतागुंत झाल्यास पुढील उपचार मोफत दिले जातात़ या योजनेंतर्गत जास्तीत जास्त आजारांचा समावेश केल्याने रुग्णांनाही त्याचा लाभ होत आहे़ विशेषत: मुंबई, पुणे येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये ही योजना कार्यरत असल्याने गंभीर आजारांच्या रुग्णांनाही मोफत उपचार मिळू लागले आहेत़
नोंदणी करण्याचे आवाहन
४महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत रेशनकार्ड आणि आधार कार्ड असणाºया व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो़ जिल्ह्यात अनेक कुटंूबियांनी योजनेचा लाभ घेतला आहे़
४या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ई कार्ड दिले जाते़ जिल्हा रुग्णालयात संबंधितांनी नोंदणी केल्यास त्यांना ई-कार्ड दिले जाते़
४आतापर्यंत २ हजार ६०० जणांनीच नोंदणी केली आहे़ नागरिकांनी आपले सरकार केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करून ई-कार्ड प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे़