परभणी : गारपीट नुकसानीसाठी ५८ कोटी रुपयांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:43 AM2018-02-24T00:43:27+5:302018-02-24T00:43:32+5:30
दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात गारपीटीने शेती पिके आडवी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे नोंदविली आहे.
प्रसाद आर्वीकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात गारपीटीने शेती पिके आडवी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे नोंदविली आहे.
११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. निसर्गाच्या या संकटात हातातोंडाशी आलेली पिके हातची गेली होती. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. पहिल्या दिवशी जिंतूर आणि सेलू तालुक्यात, दुसºया दिवशी परत सेलू, पूर्णा तालुक्यात आणि त्यानंतर गंगाखेड, पालम, सोनपेठ या तालुक्यात गारपीटीने थैमान घातले होते. रबीचा हंगाम अंतिम चरणात आहे. गहू, ज्वारी ही पिके वाढीस लागली होती तर हरभरा काढणीला आला होता. गारपीटीने ही सर्व पिके आडवी झाली. तसेच बागायती आणि फळ पिकांनाही गारपीटीचा फटका सहन करावा लागला होता.
जिल्हा प्रशासनाने गारपीट झाल्यानंतर लगेच प्राथमिक अहवाल नोंदवित प्रत्यक्ष पंचनाम्यांनाही सुरुवात केली होती. हे पंचनामे पूर्ण झाले असून, २२ फेब्रुवारी रोजी अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार सेलू, सोनपेठ, गंगाखेड आणि जिंतूर या चार तालुक्यातील ३० हजार १८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकºयांना मदत देण्यासाठी २५ कोटी १० लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे. त्याचप्रमाणे सेलू, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि पूर्णा या पाच तालुक्यात ३६ हजार ६७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, नुकसान भरपाईसाठी ३३ कोटी २२ लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे. तालुकानिहाय नुकसानीसह लागणाºया नुकसान भरपाई रकमेची मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे. त्यामुळे राज्य शासन आता प्रत्यक्षात किती नुकसान भरपाई देते, याकडे लक्ष लागले आहे.
पालम तालुक्यात सर्वाधिक नुकसान
४जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी केलेल्या प्रत्यक्ष पंचनाम्यामध्ये पालम तालुक्यात गारपीटीने पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.
४या तालुक्यातील २४ हजार ९२८ हेक्टरवरील पिके गारपीटीच्या भक्ष्यस्थानी पडली. विशेष म्हणजे, या सर्व पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, त्यासाठी २१ कोटी ८२ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली. त्या खालोखाल गंगाखेड तालुक्यामध्ये १५ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील पिके गारपीटीने आडवी झाली. या पिकांचे ३३ ते ५० टक्क्यांपर्यंतचे नुकसान झाले आहे. त्यासाठी १३ कोटी २९ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे.