परभणी : ६८२ कोटी रुपये खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:40 AM2018-01-28T00:40:35+5:302018-01-28T00:40:40+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर २३ जानेवारीपर्यंत ६८२ कोटी २९ लाख रुपय वर्ग करण्यात आले आहेत़

Parbhani: Rs 682 crores on account | परभणी : ६८२ कोटी रुपये खात्यावर

परभणी : ६८२ कोटी रुपये खात्यावर

googlenewsNext

मारोती जुंबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर २३ जानेवारीपर्यंत ६८२ कोटी २९ लाख रुपय वर्ग करण्यात आले आहेत़
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती़ त्यानुसार परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले़ परंतु, शासनाच्या अनेक निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़ शासनाच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवर पुर्वी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची ग्रीन लिस्ट टाकण्यात येत होती़ परंतु, नंतर तीही बंद करण्यात आली़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांच्या नजरा ग्रीन लिस्टकडे लागल्या होत्या़ या कर्जमाफीवर तब्बल १ महिना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्जमाफी मिळते की नाही, या विचारात जिल्ह्यातील शेतकरी अडचला होता़
त्यानंतर शासनाकडून जिल्हा बँक, व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांना पात्र लाभार्थी शेतकºयांच्या ग्रीन लिस्ट याद्या प्राप्त झाल्या़ त्यानुसार २३ जानेवारपर्र्यंत जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर ६८२ कोटी २९ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत़ उर्वरित शेतकºयांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा करणे बाकी आहे़
यासाठीची काही रक्कम जिल्ह्याला मिळालेली आहे़ शेतकºयांच्या कर्ज खात्याच्या माहितीतील त्रुटी तसेच अर्जांमध्ये असलेल्या अपुºया माहितीमुळे कर्जखात्यात रक्कम वर्ग करण्यास बँकांना अडचणी येत आहेत़ त्यामुळे या अडचणी दूर करून येत्या काही दिवसांत उर्वरित शेतकºयांच्या खात्यावर कर्जमार्फीची रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून ‘लोकमत’ला देण्यात आली़
एसबीआयकडे : ४४१ कोटींची रक्कम वर्ग
जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर शासनाने ६८२ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़ यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने २९ हजार ८१४ शेतकºयांच्या खात्यावर ४५ कोटी २७ लाख, इलाहाबाद बँकेने २ हजार ५ शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी २७ लाख, आंध्रा बँकेने ३८१ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ६० लाख, अ‍ॅक्सीस बँकेने १ शेतकºयाच्या खात्यावर १४ हजार, बँक आॅफ बडोदा बँकेने ३८१ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी १ लाख, बँक आॅफ इंडियाने १० शेतकºयांच्यावर २ लाख ५० हजार, बँक आॅफ महाराष्ट्राने ६ हजार १९९ शेतकºयांच्या खात्यावर ४४ कोटी १९ लाख १९ हजार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १७ हजार ७०३ शेतकºयांच्या नावे १०४ कोटी ६७ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियाने ६४ हजार ६७२ शेतकºयांच्या नावे ४४१ कोटी १२ लाख अशी कर्जमाफीची रक्कम वर्ग केली आहे़
शेतकºयांना मिळेना माहिती
राज्य शासनाने प्रत्येक शेतकºयाची दीड लाखांची रक्कम छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार १९४ शेतकºयांसाठी ६९६ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली़ त्यातील ९९ टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यावर वर्गही करण्यात आली़ परंतु, बहुतांश शेतकºयांना आपले कर्जमाफ झाले की नाही, याची माहिती मिळेनाशी झाली आहे़ त्यामुळे कर्जमाफ होवूनही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी संभ्रमात आहेत़

Web Title: Parbhani: Rs 682 crores on account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.