परभणी : नियम डावलणाऱ्यांकडून वसूल केले ९० लाख १८ हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:25 AM2019-12-30T00:25:59+5:302019-12-30T00:27:14+5:30
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने वर्षभरात नियम मोडणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यातून ९० लाख १८ हजार रुपयांचा दंड शासन जमा केल्याची माहिती या शाखेच्या वतीने देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने वर्षभरात नियम मोडणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यातून ९० लाख १८ हजार रुपयांचा दंड शासन जमा केल्याची माहिती या शाखेच्या वतीने देण्यात आली.
परभणी शहरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. त्यात नियम मोडणाºया वाहनचालकांकडून दंडही वसूल केला जात आहे. सरत्या वर्षामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्याखाली एकूण ३६ हजार ७२७ केसेस करण्यात आल्या असून त्यातून ८४ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड शासन जमा करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे शहरी भागातून अवैध प्रवासी वाहतूक करणाºया २२३ वाहनांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. या खटल्यांच्या माध्यमातून ४ लाख १२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे दारु पिऊन वाहन चालविणाºया १९२ वाहनचालकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करुन १ लाख ५२ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या संपूर्ण कारवाईत वर्षभरामध्ये वाहनचालकांकडून दंड स्वरुपात वसूल केलेले ९० लाख १८ हजार २०० रुपये शासनाकडे जमा करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहरात विविध भागामध्ये वाहनांची आणि कागदपत्रांची तपासणी करणे, वाहतुकी नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जात आहे. वर्षभरात शहरात विविध ठिकाणी नियमित मोहिमा राबवून वाहतूक शाखेने ही कारवाई केली आहे.
शहर वाहतूक शाखेचे आवाहन
४वाहतूक शाखेच्या वतीने केल्या जाणाºया कारवाईकडे नागरिकांनी सकारात्मक भूमिकेने पहावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. कारवाई होऊ नये, यासाठी वाहनधारकांनी वाहनांमध्ये कोणताही बदल करु नये, वाहन चालविण्याचा परवाना, वाहनांची सर्व कागदपत्रे सोबत बाळगावीत, नियमाप्रमाणे वाहन क्रमांकाची प्लेट बसवावी, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देऊ नये, वाहनांची कागदपत्रे व परवाना डीजी लॉकर आणि एम परिवहन अॅपमध्ये ठेवल्यासही तो ग्राह्य धरला जातो. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.
...तर केली जाईल दंडात्मक कारवाई
४शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे काटेकोर पालन करावे. विसावा फाटा ते असोला फाटा दरम्यानचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत येतो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहने या मार्गावर उभी करु नयेत. महापालिकेने निश्चित केलेल्या वाहनतळाशिवाय इतर ठिकाणी वाहने उभी असतील तर त्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.