परभणी : दररोज होतेय ३ हजार ऊस वाढ्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:38 AM2018-12-01T00:38:39+5:302018-12-01T00:39:26+5:30
यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.
राजू पठाडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
ताडबोरगाव (परभणी) : यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.
कडवळ, मका, संकरित ज्वारी आणि चराईसाठी कुठेही गवत उगवले नसल्याने परिसरात हिरवा चारा शिल्लक नाही. सोयाबीनचे थोडेफार भूस होते, तेही संपत आले आहे. त्यामुळे पशूपालकांसमवेत चाºयाचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे. विकत चारा घेऊन जनावरांचे पालन-पोषण करण्याची वेळ पशूपालकांवर ओढावली आहे.
यंदाच्या संपूर्ण पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न आतापासूनच निर्माण झाला आहे. पशूधन सांभाळणे अवघड झाले असून दररोज शेतकºयांना चारा विकत घ्यावा लागत आहे. सध्या उसाची तोडणी सुरु असून या उसाचे वाढे विक्रीला येत आहेत. ताडबोरगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ्यांची विक्री होत आहे.
जनावरांचे पालन-पोषण करण्यासाठी पशूपालकांनी वाढ्याला पसंती दिली असून दररोज सुमारे ३ हजार वाढ्यांची या भागात विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणे जिकरीचे झाले आहे.
रब्बी ज्वारीवरही संकट
अनेक शेतकºयांनी उपलब्ध पाण्यावर चाºयासाठी ज्वारीची पेरणी केली आहे. त्यावरही आता लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाला असून या अळीने पाते, पोंगे कुरतडून नुकसान केले आहे. यामुळे ज्वारी, मका ही पिके हाती लागणार नसून चाºयाचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
शेतीला जोड म्हणून म्हैस घेऊन दुध व्यवसाय सुरु केला; परंतु, ओला चारा नसल्याने दररोज विकतचा चारा घ्यावा लागत आहे. परिणामी व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
-संतोष पठाडे, शेतकरी
अत्यल्प पावसाळामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
-सुनिता पठाडे, सरपंच