परभणीला १०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:19 AM2018-02-04T00:19:52+5:302018-02-04T00:19:56+5:30
१०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास आरोग्य विभागाने मंजुरी देऊन २० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे़ त्यामुळे स्त्री रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथे १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास आरोग्य विभागाने मंजुरी देऊन २० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे़ त्यामुळे स्त्री रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे़
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ साठ खाटांचे स्त्री रुग्णालय जुन्या इमारतीत कार्यान्वित आहे़ परंतु, जिल्ह्यातून येणाºया महिला रुग्णांची संख्या ही १५० च्या वर आहे़ त्यामुळे महिलांना उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता़ त्यामुळे परभणी येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय हवे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परभणीकरांची होती़ तसा प्रस्ताव जिल्हा रुग्णालयाने शासनाकडे पाठविला होता़ आरोग्य विभागाच्या वरिष्ठस्तरावर दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या़ आ़ डॉ़ पाटील यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केल्यामुळे परभणी येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर करून त्यास राष्टीय आरोग्य अभियानांतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ त्यास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे़ त्यामुळे स्त्री रुग्णालयास १०० खाटांची सुसज्ज इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़