परभणी :माथाडी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:42 AM2018-01-18T00:42:23+5:302018-01-18T00:42:54+5:30
येथील किराणा असोसिएशनचे काही व्यापारी हमाल कामगारांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने माथाडी कामगार संयुक्त कृती समितीने दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील किराणा असोसिएशनचे काही व्यापारी हमाल कामगारांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने माथाडी कामगार संयुक्त कृती समितीने दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
माथाडी कामगार संयुक्त कृती समितीने या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. किराणा व्यापारी असोसिएशनकडे यापूर्वी २२ डिसेंबर रोजी दरवाढ करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी कामगारांचा प्रश्न सुटावा, या उद्देशाने कामगारांनी माघार घेतली होती. मात्र त्यानंतर किराणा असोसिएशनने कामगारांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांना जाणूनबुजून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. कच्छी बाजार भागात २० वर्षांपासून हमाल कामगार काम करतात. या कामगारांना कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे. कमी दरामध्ये जास्त काम करुन घेत कामगारांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.
व्यापारी असोसिएशनकडे दरवाढी संदर्भात वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु, व्यापाºयांनी दरवाढ तर केलीच नाही. शिवाय दरवाढ मागितल्यास बाहेरील कामगार कामावर घेऊ, अशी धमकी देण्यात आली.
या सर्व बाबी लक्षात घेऊन माथाडी कामगार संयुक्त कृती समितीने दरवाढीच्या मागणीसाठी २२ जानेवारीपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना हे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर मराठवाडा हमाल माथाडी युनियनचे कॉ.राजन क्षीरसागर, शेख अब्दुल, परभणी जिल्हा मजदूर युनियनचे कॉ.विलास बाबर, शेख महेबूब, एकता हमाल युनियनचे कॉ. रोहिदास नेटके आणि हमाल माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.