परभणी : सरकता जीना उरला नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:35 AM2018-12-12T00:35:14+5:302018-12-12T00:35:52+5:30
येथील रेल्वेस्थानकावरील सरकता जीना कार्यान्वित केल्यानंतरही प्रवाशांना या सरकत्या जीन्याचा उपयोग होत नसल्याने हा जीना केवळ शोभेची वास्तू बनला असून लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वेस्थानकावरील सरकता जीना कार्यान्वित केल्यानंतरही प्रवाशांना या सरकत्या जीन्याचा उपयोग होत नसल्याने हा जीना केवळ शोभेची वास्तू बनला असून लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
परभणीरेल्वेस्थानकावरून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह अपंग बांधवांना रेल्वे प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने सरकता जीना आणि लिफ्ट उभारणीचे काम परभणीत सुरू करण्यात आले. यापैकी सरकत्या जीन्याचे काम पूर्ण झाले असून हा जीना कार्यान्वित करण्यात आला आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर अंतरावरील दादºयावर हा सरकता जीना बसविल्याने प्रवाशांसाठी तो गैरसोयीचा ठरत आहे.
रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर बहुतांश प्रवासी मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या अरूंद दादºयाचाच वापर करतात. सरकता जीना दूर अंतरावर असल्याने सुविधा असूनही या जीन्याचा वापर होत नाही. तसेच तिकीट खिडकी, आरक्षण खिडक्यांसाठी स्थानकावर नव्याने बांधकाम करण्यात आले आहे; परंतु, त्याचाही वापर अद्यापपर्यंत सुरु झाला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने निर्माण केलेल्या सुविधा प्रवाशांसाठीच कुचकामी ठरत आहेत. ्नरेल्वे प्रशासनाने याबाबींची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.