परभणी : पालम जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत पैशांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:48 PM2019-04-08T23:48:32+5:302019-04-08T23:49:43+5:30

शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये नेहमीच पैशांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्याच बरोबर दुष्काळी अनुदान वाटपात अडथळा निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

Parbhani: Scarcity of funds in the Palam District Central Bank Branch | परभणी : पालम जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत पैशांचा तुटवडा

परभणी : पालम जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत पैशांचा तुटवडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये नेहमीच पैशांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्याच बरोबर दुष्काळी अनुदान वाटपात अडथळा निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
शहरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा कार्यरत आहे. या बँकेत आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी व कर्मचाºयांची खाते आहेत. या खात्यावर शासकीय योजनांचा निधी व अन्य व्यवहार केला जातो; परंतु, मागील काही दिवसांपासून बँकेत नेहमीच पैशाचा तुटवडा जानवत असल्याने पैसे वाटप करताना कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने शेतकºयांना दुष्काळ अनुदान वाटपाचा निधी बँकेकडे वर्ग केल्याने बँकेत गर्दी वाढली आहे. बँकेत एक-एक गाव घेऊन शेतकºयांना दुष्काळ या अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सकाळपासून बँकेमध्ये हजेरी लावित आहेत. परभणी कार्यालयातून कमी प्रमाणात रोकडचा पुरवठा केला जात असल्याने शेतकºयांना सर्वाधिक फटका बसत आहे. दुष्काळी स्थिती असल्याने आर्थिक व्यवहार भागविण्यासाठी शेतकरी पैशांची उचल करीत आहेत. मात्र शेतकºयांना एकरकमी पैसा मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतकरी व अधिकारी यांच्यात नेहमीच खटके उडत आहेत.
रोकड तुटवडा असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून बँकेकडे हेलपाटे मारून बेजार होत आहेत. वरिष्ठ अधिकाºयांच्या कारभाराचा फटका शेतकºयांना बसत असून शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.

Web Title: Parbhani: Scarcity of funds in the Palam District Central Bank Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.