परभणी ; शालेय पोषण आहार तपासणीपथकाचा दौरा रद्द; मुख्याध्यापक सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:23 AM2018-12-12T00:23:26+5:302018-12-12T00:24:06+5:30
राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातील सहा दिवस विविध प्रकारचा पोषण आहार दिला जातो. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. या महत्त्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यात व्यवस्थित होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाने ११ सदस्यांचे पथक नियुक्त केले होते. त्यामध्ये अन्न व पोषण विभागाच्या केंद्रातील प्रमुख प्रा.उमा भोयर यांची पथकप्रमुख म्हणून तर शालेय पोषण आहारच्या संचालक जी.विजया भास्कर, प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण, सहाय्यक प्रा.स्वाती ध्रुव, युनिसेफचे प्रतिनिधी, मुख्य सल्लागार भुपेंद्र कुमार, वरिष्ठ सल्लागार दिनेश प्रधान यांची सदस्य म्हणून तर सहाय्यक संशोधक म्हणून डॉ.श्रूती कांटावाला, श्वेता पटेल, दिव्या पटेल, मयुरी राणा यांचा पथकात समावेश होता.
३ ते १० डिसेंबर दरम्यान या पथकातील अधिकारी राज्यातील विविध शाळांना भेटी देऊन शालेय पोषण आहाराबाबतची माहिती घेणार होते. त्यानुसार या पथकाला प्रारंभी साताºयाला तपासणीसाठी जायचे होते; परंतु, या पथकाने ५ डिसेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळची सहल केली. त्यानंतर दुपारी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर या पथकाने मराठवाड्यातील शाळांची तपासणी करणे आवश्यक होते; परंतु, तपासणी न करताच हे पथक निघून गेले. १० डिसेंबरपर्यंत पथकाचा दौरा असल्याने सोमवारपर्यंत पथक जिल्ह्यात तपासणीसाठी येईल, याची विविध शाळांमधील काही मुख्याध्यापकांना धास्ती होती; परंतु, या पथकाने परभणी जिल्ह्यात न येताच आपला दौरा गुंडाळला. त्यामुळे विविध शाळांमधील मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
या बाबींची केली होती तयारी
४शालेय पोषण आहार योजना अंमलबजावणीबाबची पाहणी करण्यासाठी येणाºया पथकाची सर्व शाळांनी तयारी केली होती. या अनुषंगाने उपलब्ध असलेली कागदपत्रे तयार करुन ठेवण्यात आली होती. स्वयंपाकगृहाची साफसफाई करण्यात आली होती. तसेच स्टॉक रजिस्टर, धान्यादिमाल उपलब्ध करुन ठेवण्यात आला होता. तसेच वैद्यकीय दाखला, नोंदणी पत्रक, मेनू प्रमाणे आहार देण्याची माहिती (प्रत्यक्ष फक्त पिवळा भात दिला जातो), हॅण्डवॉश, साबण विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी, टॉवेल, आसनपट्ट्या आदी बाबतची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विविध मुख्याध्यापकांनी तशी तयारी केली होती; परंतु, पथकाचा दौराच रद्द झाल्याने मुख्याध्यापकांची या बाबीतून सुटका झाली आहे.