परभणी : दुसऱ्या टप्प्यातील १६६ कोटी बँकेकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:19 AM2019-12-24T00:19:30+5:302019-12-24T00:20:09+5:30
अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़
परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते़ त्यात कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले़ या शेतकºयांना जिरायती पिकांसाठी ८ हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे शासनाने मदत जाहीर केली असून या मदतीचा पहिला टप्पा जिल्ह्यामध्ये वाटप झाला आहे़
मागील आठवड्यात १९१ कोटी रुपयांच्या मदतीचा दुसरा टप्पा जिल्ह्याला प्राप्त झाला़ प्रशासनाने प्राप्त झालेली ही मदत तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग केली़ त्यानंतर तहसीलस्तरावरुन मदतीची ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकºयांच्या यादीनिहाय बँकांकडे वर्ग केली असून, बँक प्रशासन आता प्रत्यक्ष खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करणार आहे़ त्यामुळे दुसºया टप्प्यामध्ये बहुतांश शेतकºयांना मदत निधी प्राप्त होईल, अशी आशा निर्माण झाली आहे़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी तालुक्याने ३४ कोटी २१ लाख ८५ हजार रुपये, जिंतूर ३० कोटी ६२ लाख ४५ हजार, मानवत १५ कोटी ६१ लाख ९८ हजार, सोनपेठ ११ कोटी ६१ लाख ३० हजार, गंगाखेड २० कोटी ८२ लाख ३० हजार, पालम १७ कोटी ५८ लाख ५९ हजार अशी दुसºया टप्प्यातील संपूर्ण रक्कम शेतकºयांच्या यादीसह बँकेकडे वर्ग केली आहे़ सेलू तालुक्याला २१ कोटी ४१ लाख ८० हजार रुपये प्राप्त झाले होते़ त्यापैकी १६ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपये (७८़३८ टक्के) आणि पूर्णा तालुक्याने २१ कोटी ६३ लाख ८८ हजार रुपयांपैकी १८ कोटी ९७ लाख १९ हजार रुपये (८७़६८ टक्के) बँकेकडे वर्ग केले आहेत़
२ लाख शेतकºयांना मिळणार लाभ
४अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी प्राप्त झालेल्या दुसºया टप्प्याची मदत सद्यस्थितीला बँकांकडे वर्ग केली असून, त्यातून १ लाख ९२ हजार ९९५ शेतकºयांच्या खात्यावर ही रक्कम नुकसानी प्रमाणे वर्ग केली जाणार आहे़
४त्यामध्ये परभणी तालुक्यातील ३६ हजार ४८३, सेलू १९ हजार ९३६, जिंतूर ३१ हजार १६६, मानवत १६ हजार ६५९, सोनपेठ १४ हजार ३४१, गंगाखेड २८ हजार ३६९, पालम २१ हजार ८८६ आणि पूर्णा तालुक्यातील २४ हजार १५५ शेतकºयांना बाधित पिकांच्या नुकसानीपोटी मदत मिळणार आहे़
४त्यामुळे या शेतकºयांना आता अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नसून, लवकरच त्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणार आहे.
तिसºया टप्प्याची प्रतीक्षाच !
४अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतीचे दोन टप्पे जिल्ह्याला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. अजूनही अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. या जिल्ह्यात सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक शेतकºयांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन टप्प्यांचे वाटप झाल्यानंतरही मदतीपासून वंचित राहणाºया शेतकºयांना तिसºया टप्प्याच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.