परभणी : वाळू उपस्यासाठी वापरलेले तराफे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:02 AM2019-11-28T00:02:17+5:302019-11-28T00:02:52+5:30
तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी २७ नोव्हेंबर रोजी जप्त करून जाळून नष्ट केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी २७ नोव्हेंबर रोजी जप्त करून जाळून नष्ट केले़
परतीच्या पावसामुळे तालुक्यात नद्यांना पाणी आले आहे़ पाणी असतानाही तराफ्याच्या सहाय्याने नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांना मिळाली़ त्या आधारे बुधवारी दुपारी शिवशंकर यांनी कान्हेगाव परिसरात भेट दिली़ तेव्हा या भागात १० ते १२ तराफे आढळले़ त्यानंतर तहसीलदारांसह महसूलच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून हे सर्व तराफे त्याच भागात जाळून नष्ट करण्यात आले़
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, विद्या खरवडकर यांची उपस्थिती होती़ फौजदार पांडूरंग गंधकवाड यांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर हे तराफे जाळण्यात आले़ जिल्हाधिकाºयांच्या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणाºयांचे धाबे दणाणले आहे.
वाळूही जप्त करणार
४तराफ्याच्या सहाय्याने उपसा केलेली वाळू देखील जप्त केली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी दिली़ पूर्णा नदीकाठावरील कान्हेगाव आणि माटेगाव परिसरातून १५ तराफे जप्त करून नष्ट केल्याचे टेमकर यांनी सांगितले़