परभणी : कृषी संजीवनी प्रकल्पासाठी पाच गावांची झाली निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:25 AM2018-12-24T01:25:18+5:302018-12-24T01:26:31+5:30
बदलते हवामान आणि त्यातून निर्माण होणारे शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान आधारित शेतीसाठी तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : बदलते हवामान आणि त्यातून निर्माण होणारे शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान आधारित शेतीसाठी तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थिती अल्प पर्जन्यमान आणि बदलते हवामान यामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आहे. यावर्षी खरीप आणि रबी हंगामात शेतीचा उत्पादन खर्चही पदरी पदला नाही. हवामानाच्या बदलानुसार पीकपेरा घेता यावा, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत दुसऱ्या टप्यामध्ये तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत फळबाग लागवड, एकात्मिक शेती, मधुमक्षिका पालन, कुक्कुट पालन, संरक्षित शेती, एकात्मिक शेती, रेशीम लागवड, जमीन आरोग्य सुधारणा, गांडूळ खत निर्मिती केंद्र, सेंद्रीय खत निर्मिती केंद्र उभारणे यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना मार्गदर्शन व अर्थसहाय्य केले जाणार आहे.
गाव स्तरावर ग्रामसंजीवनी स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच राहणार आहेत.