परभणी: वाहतूक सुरू होण्यापूर्वीच सिमेंट रस्त्याला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:19 AM2019-12-28T00:19:25+5:302019-12-28T00:19:57+5:30

कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे़. या महामार्गाचे काम पुर्ण होऊन त्यावर वाहने धावण्यापूर्वीच या रस्त्याला परभणी तालुक्यातील दैठणा ते धारासूर या दरम्यान भेगा पडल्याचे वास्तव समोर आले आहे़

Parbhani: Send the cement to the road before the traffic starts | परभणी: वाहतूक सुरू होण्यापूर्वीच सिमेंट रस्त्याला भेगा

परभणी: वाहतूक सुरू होण्यापूर्वीच सिमेंट रस्त्याला भेगा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे़. या महामार्गाचे काम पुर्ण होऊन त्यावर वाहने धावण्यापूर्वीच या रस्त्याला परभणी तालुक्यातील दैठणा ते धारासूर या दरम्यान भेगा पडल्याचे वास्तव समोर आले आहे़
परभणी जिल्ह्यातील महामार्गासह ग्रामीण रस्त्यांची बकाल अवस्था झालेली आहे़ त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातून जाणाऱ्या महामार्गांचे काम तातडीने हाती घेवून नागरिकांना दर्जेदार व गुळगुळीत रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली़ त्यानंतर राज्य व केंद्र शासनाने जिल्ह्यातील नागरिकांची रस्त्याबद्दलची मागणी लक्षात घेता परभणी-गंगाखेड, जिंतूर-परभणी, परभणी- पाथरी व परभणी- वसमत या चारही महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सुरू केली़ त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर केला़ या चार महामार्गापैकी परभणी- पाथरी या महामार्गाचे काम अंतीम टप्प्यात आहे तर उर्वरित तीन महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे़
केंद्र व राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याने नागरिकांच्या मागणीप्रमाणे दर्जेदार रस्ते उपलब्ध होतील, अशी अपेक्षा जिल्हावासियांना आहे; परंतु, परभणी-गंगाखेड या महामार्गाची पाहणी केली असता, परभणी तालुक्यातील दैठणा ते धारासूर या परिसरामध्ये तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याला वाहने धावण्यापूर्वीच भेगा पडल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे या रस्त्यासाठी मंजूर असलेल्या २०३ कोटी रुपयांच्या निवीतून होत असलेल्या कामांवर कंत्राटदार व अभियंत्यांचे लक्ष नाही की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़ या कामांकडे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय? असा सवाल वाहनधारक व नागरिकांतून उपस्थित केला जात आहे़
वाहने धावण्यापूर्वीच सिमेंट रस्त्याला जर भेगा पडत असतील तर हा रस्ता राज्य व केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीपर्यंत टिकेल की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होत असलेल्या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे गुणवत्तेकडे दुर्लक्ष ?
४परभणी- गंगाखेड हा राष्ट्रीय महमार्ग आहे़ त्यामुळे या रस्त्यावरून २४ तास दुचाकीसह अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते़ त्यामुळे या रस्त्याचे काम करताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे़; परंतु, या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना दैठणा ते धारासूर परिसरात सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्या आहेत़ त्यामुळे संबंधित कामाच्या दर्जाबाबत वाहनधाकांमधून साशंकता व्यक्त केली जात आहे़
काळ्या मातीचा वापर का?
४परभणी-गंगाखेड या महामार्गाचे खोदकाम झाल्यानंतर पक्का मुरूम टाकून दबाई करणे आवश्यक होते; परंतु, या महामार्गाची दबाई करताना काळ्या मातीचा वापर होत असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या होत्या़
४मात्र त्याकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले़ त्यामुळे परभणी-गंगाखेड या महामार्गावरून वाहने धावण्यापूर्वीच व रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच तडे जात आहेत़
४त्यामुळे रस्त्याची दबई करताना पक्क्या मुरूमाऐवजी सर्रास काळ्या मातीचा वापर झाला की काय ? हा रस्ता तयार करताना सिमेंट, गिट्टी व गज या तिन्हींचा आवश्यक तेवढा वापर झाला की नाही? याबाबत नागरिक व वाहनधारकांतून सवाल उपस्थित केला जात आहे़

Web Title: Parbhani: Send the cement to the road before the traffic starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.